SGPGIMS अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी; विविध 1500 हून अधिक पदांसाठी भरती.  | SGPGIMS Recruitment 2024

ही जाहिरात शेअर करा 👇🏻

संजय गांधी पोस्टग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस ही  एक प्रतिष्ठित वैद्यकीय संस्था आहे. 1983 साली स्थापन झालेली ही संस्था वैद्यकीय शिक्षण, संशोधन आणि आरोग्यसेवा या क्षेत्रांमध्ये अग्रगण्य मानली जाते. येथे विविध सुपर-स्पेशालिटी विभाग आहेत जसे की कार्डिओलॉजी, न्यूरोलॉजी, नेफ्रोलॉजी, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी आणि इतर अनेक. SGPGIMS नेहमीच अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान आणि गुणवत्तापूर्ण उपचारांसाठी ओळखली जाते.

SGPGIMS मध्ये विविध 1500 हून अधिक पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .

पदाचे नाव पदांची संख्या 
ज्युनिअर इंजिनिअर3
सिनिअर ॲडमिनिस्ट्रेटिव असिस्टंट1
स्टेनोग्राफर40
रिसेप्शनीस्ट19
नर्सिंग ऑफिसर1426
परफ्युशनिस्ट5
टेक्निशियन (रेडिओलॉजी)15
मेडिकल लॅब टेक्नॉलॉजीस्ट21
टेक्निशियन (रेडिओ थेरेपी)8
टेक्निकल असिस्टंट (न्युरो ओटोलॉजी)3
ज्युनिअर फिजिओथेरपिस्ट3
ज्युनिअर ऑक्क्युपेशनल थेरपिस्ट3
न्युक्लिअर मेडीसीन थेरपिस्ट7
टेक्निशियन (डायलिसिस)37
सॅनिटरी इन्स्पेक्टर Gr. I8

 

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता 
ज्युनिअर इंजिनिअरमान्यताप्राप्त विद्यापीठातून टेलीकम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स मधे डिप्लोमा.
सिनिअर ॲडमिनिस्ट्रेटिव असिस्टंटमान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर आणि नोटिंग आणि ड्राफ्टींगचे ज्ञान. टायपिंग स्पीड 30 w.p.m आवश्यक.
स्टेनोग्राफरमान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर. स्टेनोग्राफी स्पीड 80 w.p.m आणि टायपिंग स्पीड 30 w.p.m असणे आवश्यक. संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक.
रिसेप्शनीस्टमान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर आणि जर्नालिझम/ पब्लिक रिलेशनस मधे पदव्युत्तर.
नर्सिंग ऑफिसरमान्यताप्राप्त विद्यापीठातून B.Sc (Hons) नर्सिंग किंवा इंडियन नर्सिंग काऊन्सिलद्वारे मान्यताप्राप्त विद्यापीठातून B.Sc नर्सिंग.
परफ्युशनिस्टमान्यताप्राप्त विद्यापीठातून मेडिकल फर्फुशन मधे B.Sc पदवी.
टेक्निशियन (रेडिओलॉजी)सायन्स घेऊन १२ वी पास आणि रेडिओग्राफी चा २ वर्षांचा डिप्लोमा पूर्ण.
मेडिकल लॅब टेक्नॉलॉजीस्टमान्यताप्राप्त विद्यापीठातून मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी / मेडिकल लॅबोरेटरी सायन्स मधे पदवी.
टेक्निशियन (रेडिओ थेरेपी)सायन्स घेऊन १२ वी पास आणि रेडिओथेरेपी मधे डिप्लोमा पूर्ण.
टेक्निकल असिस्टंट (न्युरो ओटोलॉजी)मान्यताप्राप्त विद्यापीठातून स्पीच अँड हीअरिंग मधे B.Sc पदवी.
ज्युनिअर फिजिओथेरपिस्टइंटर सायन्स आणि फिजिओथेरेपी मधे पदव्युत्तर (MPT)
ज्युनिअर ऑक्क्युपेशनल थेरपिस्टइंटर सायन्स आणि ऑक्कुपेशनलथेरेपी मधे पदव्युत्तर (MOT)
न्युक्लिअर मेडीसीन थेरपिस्टलाइफ सायन्स मधे B.sc आणि DMRIT डिप्लोमा.
टेक्निशियन (डायलिसिस)डायलीसिस टेक्नॉलॉजी मधे B.sc
सॅनिटरी इन्स्पेक्टर Gr. I१० वी पास आणि सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स चे सर्टिफिकेट.

इतर पात्रता निकष, कामाचे स्वरूप आणि अनुभव विषयी माहिती जाहिरातीमद्धे सविस्तर दिलेली आहे

निवड प्रक्रिया : भारतीसाठी कॉमन रीक्रूटमेंट टेस्ट (CRT) घेण्यात येईल. CRT परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे निवड केली जाईल. या विषयीची सविस्तर माहिती जाहिरातीमद्धे दिलेली आहे.

नोकरीचे ठिकाण : SGPGIMS, लखनऊ

वयोमर्यादा : 18 ते 40 वर्षे

अर्ज फी :

  • एससी / एसटी  : 708/-
  • इतर प्रवर्ग : 1180/-

वेतन : वेतन 7 व्या वेतन आयोगानुसार असेल.

पदाचे नाव वेतन स्तर
ज्युनिअर इंजिनिअरLevel-6
सिनिअर ॲडमिनिस्ट्रेटिव असिस्टंटLevel-4
स्टेनोग्राफरLevel-4
रिसेप्शनीस्टLevel-5
नर्सिंग ऑफिसरLevel-7
परफ्युशनिस्टLevel- 6
टेक्निशियन (रेडिओलॉजी)Level- 6
मेडिकल लॅब टेक्नॉलॉजीस्टLevel-6
टेक्निशियन (रेडिओ थेरेपी)Level- 6
टेक्निकल असिस्टंट (न्युरो ओटोलॉजी)Level- 6
ज्युनिअर फिजिओथेरपिस्टLevel- 6
ज्युनिअर ऑक्क्युपेशनल थेरपिस्टLevel- 6
न्युक्लिअर मेडीसीन थेरपिस्टLevel-5
टेक्निशियन (डायलिसिस)Level-5
सॅनिटरी इन्स्पेक्टर Gr. ILevel-5

 

अर्ज कसा भरावा :

  • ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिली आहे.
  • वेबसाईट वर जाऊन न्यू युजर असल्यास “Registration for New Users” वर क्लिक करा आणि रजिस्टर करा.
  • नंतर फॉर्म काळजीपूर्वक भरा. त्यानंतर फोटो सही आणि इतर कागदपत्रे अपलोड करा
  • सर्व माहिती भरल्यावर कन्फर्म करून फॉर्म सबमिट करा.
  • शेवटी पेमेंट करा आणि मग फॉर्म ची प्रत सेव्ह करून ठेवा.

महत्वाच्या लिंक :

SGPGIMS अधिसूचना जाहिरात 

ऑनलाइन अर्जाची लिंक

(ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यास लवकरच सुरवात होईल. कृपया वेबसाइटला नियमित भेट देत रहा.)

अर्ज भरायची अंतिम तारीख : NA

इतर सूचना : 

  1. उमेदवारांनी अर्जाच्या योग्य रकान्यात अर्ज केलेल्या पदासाठी वरील जाहिरात क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे.
  2. ऑनलाइन अर्जाच्या मुद्रित / हार्ड कॉपीसह कोणतेही दस्तऐवज पोस्टाने पाठविण्याची आवश्यकता नाही. तथापि, अर्जदारांना त्यांच्या अर्जाची एक मुद्रित / हार्ड कॉपी ठेवण्याचा सल्ला दिला जातो.
  3. नियमित नोकरीत असलेल्या अर्जदारांनी नियोक्त्यांकडून “ना हरकत प्रमाणपत्र” सादर करणे आवश्यक आहे.
  4. लेखी चाचणी/कौशल्य चाचणी/मुलाखत मध्ये उपस्थित राहण्यासाठी कोणताही TA/DA स्वीकारला जाणार नाही
  5. सर्व वाद/मतभेद किंवा खटले केवळ लखनौ न्यायालयाच्या प्रादेशिक अधिकारक्षेत्राच्या अधीन असतील.
  6. उमेदवाराने दिलेली कोणतीही माहिती आणि भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर ती खोटी असल्याचे आढळल्यास, उमेदवाराची उमेदवारी सरसकट नाकारली जाईल.
  7. नियुक्ती अधिकाऱ्यांच्या निर्णयानुसार पदे/पदांची संख्या वाढू/कमी होऊ शकते.

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.