टाटा मेमोरियल सेंटर (TMC) हे एक व्यापक कर्करोग केंद्र आहे ज्यामध्ये रुग्णांची काळजी, कर्करोग प्रतिबंध, कर्करोग संशोधन आणि ऑन्कोलॉजी आणि संबंधित विषयांमध्ये कार्य केले जाते, TMC ही एक स्वायत्त संस्था आहे, ज्याचे नियंत्रण भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागाद्वारे केले जाते. TMC होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूट (HBNI) शी संलग्न आहे.
TMC अंतर्गत टाटा मेमोरिअल हॉस्पिटल परेल येथे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
मेडिकल फिजिसिस्ट ‘C’ | M.sc (फिजिक्स) आणि रेडियोलॉजी फिजिक्स डिप्लोमा किंवा AERB ने प्रमाणित केलेले समतुल्य सर्टिफिकेट. |
लोअर डीवीजन क्लार्क | मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर आणि मायक्रोसॉफ्ट ऑफिस चे ज्ञान. |
स्टेनोग्राफर | मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर आणि 80 w.p.m सह शॉर्ट हॅण्ड कोर्स. 40 w.p.m टायपिंग स्पीड आणि कमीतकमी 3 महिन्याचा संगणकाचा कोर्स. |
फिमेल नर्स | जनरल नर्सिंग मिड वायफरी आणि ओन्कोलॉजी मधे डिप्लोमा किंवा बेसिक किंवा पोस्ट बेसिक B.sc नर्सिंग. |
टेक्निशियन | सायन्स घेऊन 12 वी पास आणि 1 वर्षांचा डिप्लोमा किंवा संबंधित कामाचा 6 महिन्याचा अनुभव |
इतर पात्रता निकष, कामाचे स्वरूप आणि अनुभव विषयी माहिती जाहिरातीमद्धे सविस्तर दिलेली आहे
निवड प्रक्रिया : प्राप्त झालेले अर्ज तपासण्यात येतील आणि उमेदवाराची गुणवत्ता, अनुभव आणि इतर निकषांच्या आधारावर मुलाखतीसाठी किंवा पुढील प्रक्रियेसाठी निवड करण्यात येईल.
नोकरीचे ठिकाण : टाटा मेमोरिअल हॉस्पिटल परेल, मुंबई
वयोमर्यादा :
पदाचे नाव | वयोमर्यादा |
मेडिकल फिजिसिस्ट ‘C’ | 35 वर्षे |
लोअर डीवीजन क्लार्क | 27 वर्षे |
स्टेनोग्राफर | 27 वर्षे |
फिमेल नर्स | 44 वर्षे |
टेक्निशियन | 30 वर्षे |
अर्ज फी : NA
वेतन :
पदाचे नाव | वेतन |
मेडिकल फिजिसिस्ट ‘C’ | Rs.56,100/- |
लोअर डीवीजन क्लार्क | Rs.19,900/- |
स्टेनोग्राफर | Rs.25500/- |
फिमेल नर्स | Rs. 44,900/- |
टेक्निशियन | Rs.25,500/- |
अर्ज कसा भरावा :
- ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिली आहे.
- न्यू युजर असल्यास रजिस्टर करा.
- वेबसाईट वर जाऊन TMC/AD/52/2024 ही Advt No सिलेक्ट करा.
- इच्छुक असलेले पद निवडा.
- नंतर फॉर्म काळजीपूर्वक भरा. त्यानंतर फोटो सही आणि इतर कागदपत्रे अपलोड करा
- सर्व माहिती भरल्यावर कन्फर्म करून फॉर्म सबमिट करा.
- फॉर्म ची प्रत सेव्ह करून ठेवा
महत्वाच्या लिंक :
अर्ज भरायची अंतिम तारीख : 07.05.2024 (5 PM)
पदांची संख्या :
पदाचे नाव | पदांची संख्या |
मेडिकल फिजिसिस्ट ‘C’ | 1 |
लोअर डीवीजन क्लार्क | 3 |
स्टेनोग्राफर | 1 |
फिमेल नर्स | 22 |
टेक्निशियन | 1 |
इतर सूचना :
- उमेदवारांनी त्यांची उमेदवारी फक्त “ऑनलाइन अर्ज” द्वारे पाठविली पाहिजे. ऑनलाइन अर्ज भरताना उमेदवारांना फॉर्ममध्ये नमूद केलेली आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
- ऑनलाइन अर्जात दिलेल्या माहितीच्या आधारे उमेदवारांची सुरुवातीला तपासणी केली जाईल आणि मुलाखत / लेखी परीक्षा / कौशल्य चाचणीसाठी बोलावले जाईल.
- टाटा मेमोरियल सेंटर कोणत्याही उमेदवाराला कोणतेही कारण न देता लेखी परीक्षा/मुलाखत/कौशल्य चाचणीसाठी उपस्थित राहण्यासाठी न बोलावण्याचा अधिकार राखून ठेवते.
- कोणत्याही स्वरूपात प्रचार केल्यास उमेदवारी अपात्र ठरेल. विविध संवर्गांतर्गत पदांचे आरक्षण शासनानुसार लागू होईल. नियम.
- टीएमसी एकत्रित मोबदल्यावर निश्चित मुदतीसाठी “कंत्राटी आधारावर” नियुक्ती ऑफर करण्याचा पर्याय देखील वापरू शकते.
टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.