बहुचर्चित 2023 ची तलाठी भरती नुकतीच काही महिन्यांपूर्वी पार पडली. आता उमेदवारांना वेध लागले आहेत ते निकालाचे. talathi bharti – तलाठी भरती चा निकाल कधी लागेल या विषयी सर्वांना उत्सुकता आहे.
talathi bharti – तलाठी भरती चा निकाल कधी लागणार ?
या संबंधी अजून कोणतीही ठोस बातमी आलेली नसली तरी talathi bharti – तलाठी भरती चा निकाल या महिन्यात म्हणजे डिसेंबर 2023 मध्येच लागेल अशी आशा आहे.
कसा पहावा talathi bharti – तलाठी भरती चा निकाल?
तलाठी भरतीचा निकाल महाराष्ट्र सरकारच्या महाभुमी साईट वर प्रदर्शित होणार आहे. त्यासाठी परीक्षा दिलेल्या उमेदवारांनी वेळोवेळी mahabhumi.gov.in हे संकेत स्थळ पाहत राहणे आवश्यक आहे.
कशी असेल talathi bharti – तलाठी भरती चा निकाल लागल्यानंतरची प्रक्रिया ?
- शासन निर्णय, महसूल व वन विभाग क्र.प्रनिमं-२००९/प्र.क्र.३५६/ई-१०, दि.०१/०१/२०१० मधील तरतुदीनुसार व शासन निर्णय, सामान्य प्रशासन शासन निर्णय क्र. प्रानिमं१२२२/प्र.क्र५४/का.१३-अ दि.४ मे २०२२ मधील तरतुदीनुसार या पदांकरिता मौखिक परीक्षा (मुलाखती) घेण्यात येणार नाहीत.
- उमेदवारांची निवडसूची तयार करणेसाठी शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग क्र. एसआरव्ही-१०९७/प्र.क्र.३१/९८/१६अ, दि.१६/३/१९९९ आणि शासन शुध्दीपत्रक, सामान्य प्रशासन विभाग क्र. संकीर्ण१११९/प्र.क्र३९/१६-अ, दि. दि. १९/१२/२०१८ तसेच शासन निर्णय क्र. प्रानिमं१२२२/प्र.क्र५४/का.१३-अ दि.४ मे २०२२ अन्वये कार्यवाही करण्यात येईल.
- शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र. प्रानिमं१२२२/प्र.क्र५४/का.१३-अ दि.४ मे २०२२ मधील तरतुदीनुसार गुणवत्ता यादीमध्ये अंतर्भाव करण्यासाठी उमेदवारांनी एकुण गुणांच्या किमान ४५ टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील.
- परीक्षेचा निकाल (निवडसुची) तयार करतांना परीक्षेत ज्या उमेदवारांना समान गुण असतील अशा उमेदवारांचा प्राधान्यक्रम हा महाराष्ट्र शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्र. प्रानिमं१२२२/प्र.क्र५४/का.१३-अ दि.४ मे २०२२ मध्ये नमुद निकषांच्या आधारे क्रमवार लावला जाईल.
talathi bharti – तलाठी भरती विषयी खालील नियम माहिती असणे आवश्यक.
- सदर भरती प्रक्रिया राज्यस्तरावरुन एकत्रितरित्या राबविली जात असली तरी, सदर तलाठी संवर्गाची यादी तयार करताना त्या- त्या जिल्हयात भरावयाच्या पदांचा विचार करुन, प्रत्येक जिल्हयाची स्वतंत्र निवड यादी तयार करण्यात येऊन त्यानुसार प्रत्येक जिल्हयाची स्वतंत्र निवड यादी जाहीर केली जाईल. उमेदवारास मिळालेले गुण त्याने अर्ज केलेल्या जिल्हयाकरीताच विचारार्थ घेतले जातील व त्याचा अन्य जिल्हयातील निवड यादीशी कोणताही संबंध असणार नाही.
- उमेदवारांना ज्या जिल्हयाच्या निवडसूची मध्ये निवड जाहीर केली आहे अशा पात्र उमेदवारांना संबंधित जिल्हा हेच नियुक्तीसाठी कार्यक्षेत्र असणार आहे. निवडसूचीतील उमेदवार आवश्यक ती पात्रता पूर्ण करतील त्यांना कागदपत्रे पडताळणीअंती वैद्यकीय व चारित्र पडताळणी पूर्ण करुन नियुक्तीपत्र देण्यात येतील. नियुक्ती बाबतचे सर्व अधिकार हे संबंधित जिल्हयाचे जिल्हाधिकारी यांना असतील.
- अंतिम निवड यादीतील पात्र उमेदवारांनी सादर केलेल्या विविध प्रमाणपत्राच्या साक्षांकित प्रती मुळ प्रमाणपत्राचे आधारे कागदपत्रे तपासणीवेळी तपासण्यात येतील. सदर प्रमाणपत्राच्या साक्षांकित प्रती मुळ प्रमाणपत्राच्या आधारे कागदपत्र तपासण्याच्या वेळी उपलब्ध करुन देणे उमेदवारांना बंधनकारक राहील. त्यामधील प्रमाणपत्रे खोटी किंवा चुकीची आढळल्यास संबंधित उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.
कधी असेल पुढील talathi bharti – तलाठी भरती?
या संबंधी अजून कोणतीही बातमी आली नसली तरी २०२४ च्या मध्यार्धात किंवा शेवटी असू शकते . पण त्यावेळी २०२३ च्या भरतीच्या तुलनेत कमी जागा असण्याची शक्यता आहे. तरी या संबंधीची माहिती परिपत्रक आल्यावरच समजेल