फ्रेशर्ससाठी IRDAI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; विविध विभागांत असिस्टेंट मॅनेजर पदांसाठी भरती. | IRDAI Assistant Manager Recruitment 2024

ही जाहिरात शेअर करा 👇🏻

भारताच्या विमा उद्योगाच्या नियमन आणि विकासासाठी विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) ही स्वतंत्र संस्था आहे. 1999 साली IRDAI ची स्थापना करण्यात आली होती. विमा कंपन्यांच्या कार्यपद्धतींचे निरीक्षण, ग्राहकांचे संरक्षण आणि विमा उद्योगाच्या विकासास प्रोत्साहन देणे हे या प्राधिकरणाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. IRDAI भारतातील विमा क्षेत्राच्या नियमनासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.

IRDAI मध्ये विविध विभागांत असिस्टेंट मॅनेजर पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .

शाखापदांची संख्या
Actuarial5
फायनान्स5
लॉ5
आयटी5
रिसर्च5
जनरलिस्ट24
IRDAI Recruitment Qualification / IRDAI भरती शैक्षणिक पात्रता : 
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
Actuarialमान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 60% गुणांसह पदवीधर आणि २०१९ च्या अभ्यासक्रमानुसार IAI चे ७ पेपर्स पास असणे आवश्यक.
फायनान्समान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 60% गुणांसह पदवीधर आणि ACA/AICWA/ACMA/ACS/CFA पूर्ण.
लॉमान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 60% गुणांसह Law पदवी
आयटीमान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 60% गुणांसह इंजिनियरिंग ((Electrical / Electronics
/ Electronics and Communication / Information
Technology / Computer Science/ Software Engineering) पदवी.
किंवा MCA
किंवा कोणत्याही पदवी आणि कॉम्प्युटर किंवा आयटी मध्ये पदव्यूत्तर पदवी.
रिसर्चमान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 60% गुणांसह मधे Economics / Econometrics / Quantitative Economics /
Mathematical Economics / Integrated Economics Course/
Statistics/ Mathematical Statistics/Applied Statistics &
Informatics पदव्युत्तर किंवा २ वर्षांचा पोस्ट ग्र्याज्युएट डिप्लोमा.
जनरलिस्टमान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 60% गुणांसह पदवीधर
IRDAI Recruitment Selection Procedure / IRDAI भरती निवड प्रक्रिया : 
  • निवड प्रिलीम , डिस्क्रिपटिव आणि मुलाखत अशा 3 टप्प्यात होईल .
  • प्रिलीम परीक्षेचे स्वरूप खालील प्रमाणे असेल. IRDAI Assistant Manager Recruitment prelim exam pattern
  • डिस्क्रिपटिव परीक्षेचे स्वरूप खालील प्रमाणे असेल.IRDAI Assistant Manager Recruitment Descriptive exam pattern
IRDAI Recruitment Place of Work / IRDAI भरती नोकरीचे ठिकाण : 

आवश्यकतेनुसार देशातील  IRDAI च्या कोणत्याही कार्यालयात॰

IRDAI Recruitment Age limit / IRDAI भरती वयोमर्यादा : 

२१ ते ३० वर्षे (इतर राखीव गटांचे आरक्षण शासनाच्या नियमांनुसार असेल )

IRDAI Recruitment Application fee / IRDAI भरती अर्ज फी : 
  • एससी / एसटी / दिव्यांग : १००/-
  • इतर प्रवर्ग : ७५०/-
IRDAI Recruitment Salary / IRDAI भरती वेतन : 

सुरवातीला मासिक वेतन 44,500/- असेल (scale of Rs. 44500-2500(4)-54500-2850(7)-74450-EB-2850(4)-85850-
3300(1)-89150 )

IRDAI Recruitment Application Procedure / IRDAI भरती अर्ज कसा भरावा : 
  • IRDAI भरतीच्या ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिली आहे.
  • वेबसाईट वर जाऊन न्यू युजर असल्यास रजिस्टर करा.
  • नंतर फॉर्म काळजीपूर्वक भरा. त्यानंतर फोटो सही आणि इतर कागदपत्रे अपलोड करा
  • सर्व माहिती भरल्यावर कन्फर्म करून फॉर्म सबमिट करा.
  • शेवटी पेमेंट करा आणि मग फॉर्म ची प्रत सेव्ह करून ठेवा.
IRDAI Recruitment Last Date / IRDAI भरती अर्ज भरायची अंतिम तारीख : 

20/09/2024

महत्वाच्या लिंक :

IRDAI अधिसूचना जाहिरात 

ऑनलाइन अर्जाची लिंक

इतर सूचना : 
  1. उमेदवारांना परीक्षेच्या आवारात कॅल्क्युलेटर वापरण्याची किंवा त्यांच्याकडे ठेवण्याची परवानगी नाही.
  2. या अधिसूचनेमुळे उद्भवलेल्या दाव्याच्या किंवा विवादाच्या कोणत्याही प्रकरणाच्या संदर्भात कोणतीही कायदेशीर कार्यवाही आणि/किंवा प्रतिसादातील अर्ज केवळ हैदराबादमध्येच सुरू केला जाऊ शकतो.
  3. परीक्षा/मुलाखतीसाठी उमेदवाराला बोलावणे हे काटेकोरपणे तात्पुरते आहे
  4. भरती/निवडीच्या संदर्भात कोणत्याही स्वरूपात प्रचार केल्याने अपात्रता येईल.
  5. कोणत्याही कारणाशिवाय प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर वरील भरती अंशतः किंवा पूर्णतः रद्द करण्याचा अधिकार IRDAI राखून ठेवते.
  6. ऑनलाइन अर्जाची नोंदणी करण्यापासून ते भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सर्व कारणांसाठी उमेदवारांना समान छायाचित्र वापरण्याचा सल्ला दिला जातो.

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.