Majhi Naukri : इस्रोमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; HSFC सेंटर मध्ये विविध पदांसाठी भरती. | ISRO HSFC Recruitment 2024

ही जाहिरात शेअर करा 👇🏻

इस्रोचे मानव अंतरिक्ष उड्डाण केंद्र (HSFC) हे भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) अंतर्गत एक महत्त्वाचे केंद्र आहे. HSFC चे मुख्यालय बेंगळुरू, कर्नाटकमध्ये आहे, आणि याची स्थापना 2019 साली करण्यात आली. या केंद्राचे मुख्य उद्दिष्ट भारताच्या मानवयुक्त अंतराळ मिशनसाठी आवश्यक तंत्रज्ञान, प्रशिक्षण आणि तयारी यांचा विकास करणे आहे. “गगनयान” हा भारताचा पहिला मानव अंतरिक्ष मिशन HSFC च्या मार्गदर्शनाखाली विकसित केला जात आहे.

HSFC मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .

पदाचे नावपदांची संख्या
मेडिकल ऑफिसर SD2
मेडिकल ऑफिसर SC1
सायंटिस्ट इंजिनिअर SC10
टेक्निकल असिस्टंट28
सायंटिफिक असिस्टंट1
टेक्निशियन B43
ड्राफ्ट्समन B13
असिस्टंट राजभाषा5

 

ISRO HSFC Recruitment Qualification / ISRO HSFC भरती शैक्षणिक पात्रता :
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
मेडिकल ऑफिसर SDमान्यताप्राप्त संस्थेतून संबंधित शाखेतून MBBS+ MD पदवी.
मेडिकल ऑफिसर SCमान्यताप्राप्त संस्थेतून संबंधित शाखेतून MBBS+ आणि २ वर्षांचा अनुभव.
सायंटिस्ट इंजिनिअर SCमान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित शाखेतून ६०% गुणांसह M.E / M.Tech आणि ६५ गुणांसह B.E / B.Tech  पदवी .
टेक्निकल असिस्टंटसंबंधित शाखेतून फर्स्ट क्लास सह ३ वर्षांचा डिप्लोमा.
सायंटिफिक असिस्टंटमान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित शाखेतून B.Sc
टेक्निशियन Bदहावी पास आणि सबंधित शाखेतून ITI सर्टिफिकेट.
ड्राफ्ट्समन Bदहावी पास आणि सबंधित शाखेतून ITI ड्राफ्ट्समन सर्टिफिकेट.
असिस्टंट राजभाषामान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर , हिंदी टायपिंग स्पीड २५ आणि संगणकाचे ज्ञान आवश्यक.

सविस्तर पद निहाय पात्रता निकष, कामाचे स्वरूप आणि अनुभव विषयी माहिती जाहिरातीमद्धे सविस्तर दिलेली आहे 

ISRO HSFC Recruitment Selection Procedure / ISRO HSFC भरती निवड प्रक्रिया : 

निवड प्रक्रिये मध्ये स्क्रीनिंग, ऑनलाइन टेस्ट, मुलाखत इ. चा समावेश आहे. पद निहाय निवड प्रक्रिया जाहिरातीमद्धे दिलेली आहे.

ISRO HSFC Recruitment Place of Work / ISRO HSFC भरती नोकरीचे ठिकाण : 

HSFC, बेंगळुरू

ISRO HSFC Recruitment Age limit / ISRO HSFC भरती वयोमर्यादा : 
पदाचे नाववयोमर्यादा
मेडिकल ऑफिसर SD18-35  वर्षे
मेडिकल ऑफिसर SC18-35  वर्षे
सायंटिस्ट इंजिनिअर SC18-30  वर्षे
टेक्निकल असिस्टंट18-35  वर्षे
सायंटिफिक असिस्टंट18-35  वर्षे
टेक्निशियन B18-35  वर्षे
ड्राफ्ट्समन B18-35  वर्षे
असिस्टंट राजभाषा18-28  वर्षे
ISRO HSFC Recruitment Application fee / ISRO HSFC भरती अर्ज फी : 

सदर भरती साठी फि ₹750 असेल. मुलाखत परीक्षा दिल्यावर खालील प्रमाणे फि रिफंड होईल.

  • एससी / एसटी / दिव्यांग / कंपनीचे कर्मचारी : 750/-
  • इतर प्रवर्ग : 500/-
ISRO HSFC Recruitment Salary / ISRO HSFC भरती वेतन : 
पदाचे नाववेतन
मेडिकल ऑफिसर SD₹ 101550 + DA
मेडिकल ऑफिसर SC₹ 84150 + DA
सायंटिस्ट इंजिनिअर SC₹ 84150 + DA
टेक्निकल असिस्टंट₹ 67350 + DA
सायंटिफिक असिस्टंट₹ 67350 + DA
टेक्निशियन B₹ 32550 + DA
ड्राफ्ट्समन B₹ 32550 + DA
असिस्टंट राजभाषा₹ 38250 + DA
ISRO HSFC Recruitment Application Procedure / ISRO HSFC भरती अर्ज कसा भरावा : 
  • ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिली आहे.
  • वेबसाईट वर जाऊन न्यू युजर असल्यास रजिस्टर करा.
  • नंतर फॉर्म काळजीपूर्वक भरा. त्यानंतर फोटो सही आणि इतर कागदपत्रे अपलोड करा
  • सर्व माहिती भरल्यावर कन्फर्म करून फॉर्म सबमिट करा.
  • शेवटी पेमेंट करा आणि मग फॉर्म ची प्रत सेव्ह करून ठेवा.
ISRO HSFC Recruitment Last Date / ISRO HSFC भरती अर्ज भरायची अंतिम तारीख : 

09/10/2024

महत्वाच्या लिंक :

ISRO HSFC अधिसूचना जाहिरात 

ऑनलाइन अर्जाची लिंक

इतर सूचना : 
  • उमेदवाराने पात्रता निकष आणि जाहिरातीमध्ये सूचित केल्याप्रमाणे इतर अटी पूर्ण केल्या आहेत याची खात्री करणे ही उमेदवाराची पूर्ण जबाबदारी आहे.
  • पोस्ट तात्पुरत्या आहेत, परंतु अनिश्चित काळासाठी सुरू राहण्याची शक्यता आहे.
  • परदेशी विद्यापीठांद्वारे प्रदान केलेल्या पदवी धारकांनी भारतीय विद्यापीठांच्या असोसिएशनने जारी केलेले समतुल्य प्रमाणपत्र सादर केले पाहिजे
  • उमेदवारांना त्यांच्या अर्जामध्ये सादर केलेल्या तपशिलांचा पुरावा सादर करावा लागेल जेव्हा आणि जेव्हा बोलावले जाईल
  • या जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या आवश्यकतांशी सुसंगत नसलेले अर्ज आणि अपूर्ण अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • उमेदवारांनी एकाच पोस्ट कोडसाठी एकाधिक अर्ज सबमिट करणे टाळावे.

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.