TCS मध्ये मेगा भरती; अंतिम वर्षात शिकत असणाऱ्या पदवीधरांसाठी सुवर्ण संधी. | TCS BPS Recruitment 2024

ही जाहिरात शेअर करा 👇🏻

जर आपण पदवीच्या शेवटच्या वर्षात शिकत आहात तर तुम्हाला जगातील सर्वात मोठ्या IT कंपन्यांपैकी एक असलेल्या TSC कंपनी मध्ये काम करण्याची सुवर्ण संधी आहे. TCS ही कंपनी जगातील 44 पेक्षा जास्त देशात काम करते.  जर तुम्ही TSC च्या परीक्षेत उत्तीर्ण झालात तर अंतिम परीक्षा पूर्ण झाल्यावर तुमच्या हातात नोकरी असेल. या भरती प्रक्रियेची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे.

शैक्षणिक पात्रता : 

  • आर्ट्स , कॉमर्स , सायन्स (बी.एससी – Maths, Physics, Chemistry, Botany, Zoology), BAF, BBI, BBA, BBM, BMS मधून शेवटच्या वर्षात शिकणारे विद्यार्थी या भरती साठी आवेदन करू शकतात.
  • भरती फॉर्म भरताना KT असू नये.
  • फूल टाइम कोर्स असावा.

निवड प्रक्रिया : निवड ऑनलाइन परीक्षेद्वारे होईल. परीक्षा 50 प्रश्नांची असेल आणि वेळ 50 मिनिटे असेल .

  1. न्युमेरिकल ॲबिलिटी (Numerical Ability )
  2. रीझनिंग ॲबिलिटी ( Reasoning Ability )
  3. क्वांटीटेटीव ॲबिलिटी (Quantitative Aptitude)

नोकरीचे ठिकाण : आवश्यतेनुसार देशभर कुठेही

वयोमर्यादा : 18 ते 28 वर्षे

अर्ज फी : NA

वेतन : 25,000-30,000 (संभाव्य)

अर्ज कसा भरावा :

  • ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिली आहे.
  • लिंक वर क्लिक केल्यावर Business Process Services हा पर्याय निवडा.
  • मग TCS च्या Next Step पोर्टल वर रजिस्टर करावे.
  • आधार कार्ड नुसार सर्व माहिती भरावी.
  • रजिस्ट्रेशन झाल्यावर TCS BPS hiring process. साठी अप्लाय करावे. या संबंधीची प्रोसेस खाली दिलेली आहे.
    TCS BPS hiring process 2024

महत्वाच्या लिंक :

TCS BPS अधिसूचना जाहिरात 

ऑनलाइन अर्जाची लिंक 

अर्ज भरायची अंतिम तारीख : 14/04/2024

इतर सूचना : 

  1. कृपया लक्षात घ्या की ही परीक्षा परीक्षा केंद्रात घेतली जाईल .
  2. 2024 मध्ये पास होणारे उमेदवारच पात्र आहेत.
  3. शिक्षणात गॅप घेतल्यास त्याबद्दलची माहिती देणे आवश्यक आहे.
  4. संबंधित केंद्रांमध्ये जागा वाटप ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वावर केले जाईल आणि त्यामुळे तुमचे पसंतीचे परीक्षा केंद्र निवडण्यासाठी लवकरात लवकर नोंदणी करणे आणि अर्ज करणे महत्त्वाचे आहे. (आधीच जागा भरल्या असल्यास तुम्ही तुमचे पसंतीचे शहर निवडू शकणार नाही).
  5. तुमच्याकडे सर्व मूळ शैक्षणिक दस्तऐवज असणे आवश्यक आहे (मार्कशीट, पदवी प्रमाणपत्र, इंटर्नशिप पत्र, कार्यानुभव पत्र इ.).
  6. TCS उमेदवारांना भरती प्रक्रियेसाठी किंवा नोकरीच्या ऑफरसाठी कोणतेही पैसे जमा करण्यास सांगत नाही.
  7. कोणतीही शंखा असल्यास ID: tcsbps.support@tcs.com | Toll-Free Helpline No.: 18002093111 वर संपर्क साधावा.
  8. कृपया लक्षात घ्या की आमच्याकडे कठोर पात्रता निकष आणि एक मजबूत निवड प्रक्रिया आहे. विहित निकषांनुसार निवड प्रक्रियेच्या विविध टप्प्यांवर तुमची पात्रता तपासली जाईल. कोणत्याही वेळी तुम्ही अपात्र आढळल्यास, किंवा तुम्ही शेअर केलेला डेटा विसंगत असल्याचे आढळल्यास, तुमची उमेदवारी अपात्र ठरविली जाईल.

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.