Accenture ही डिजिटल, क्लाउड आणि सुरक्षिततेमध्ये आघाडीची क्षमता असलेली जागतिक व्यावसायिक सेवा कंपनी आहे. 40 पेक्षा जास्त उद्योगांमध्ये अतुलनीय अनुभव आणि विशेष कौशल्ये एकत्र करून, दररोज 120 हून अधिक देशांमध्ये ग्राहकांना सेवा देते.
एक्सेंचर मध्ये असोसिएट सॉफ्टवेयर इंजीनियर पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .
शैक्षणिक पात्रता :
- कोणत्याची शाखेतून B.E/B.Tech/M.E/M.Tech पदवी किंवा MCA, M.Sc (CSE,IT) पदवी
- फक्त २०२३ आणि २०२४ बॅच अर्ज करण्यास पात्र.
- जोईनिंग वेळी KT असू नये.
निवड प्रक्रिया :
- निवड ऑनलाइन परीक्षे आणि मुलाखतीद्वारे होईल. तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला ईमेल वर लिंक येईल.
- परीक्षेमध्ये 3 टप्पे असतील आणि त्यानंतर मुलाखत होईल. या संबंधीची सविस्तर माहिती जाहिरातीमद्धे दिलेली आहे,
नोकरीचे ठिकाण : पुणे, मुंबई, बंगलोर, हैदराबाद,चेन्नई, गुरुग्राम, कोलकाता, इंदूर, जयपूर, कोईम्बतूर (तुम्ही 3 पर्याय देऊ शकता.)
वयोमर्यादा : NA
अर्ज फी : NA
वेतन : 38,000 (वार्षिक – 4,60,700)
अर्ज कसा भरावा :
- ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिली आहे.
- न्यू युजर असल्यास रजिस्टर करा.
- नंतर फॉर्म काळजीपूर्वक भरा. त्यानंतर फोटो सही आणि इतर कागदपत्रे अपलोड करा
- सर्व माहिती भरल्यावर कन्फर्म करून फॉर्म सबमिट करा.
- फॉर्म ची प्रत सेव्ह करून ठेवा.
महत्वाच्या लिंक :
अर्ज भरायची अंतिम तारीख : अर्ज लवकरात लवकर करावा.
इतर सूचना :
- तुम्ही तुमची संबंधित पदवी (या नोकरीसाठी पात्र होण्यासाठी) पदवीच्या विहित कालावधीत पूर्ण केलेली असावी. त्यामुळे तुमच्या पदवी दरम्यान कोणतेही अंतर नसावे. (उदाहरण: तुम्ही तुमचे B.Tech 4 वर्षांत किंवा M.Tech/MSc 2 वर्षांत पूर्ण केले पाहिजे)
- केवळ तुमची सर्वोच्च शैक्षणिक पात्रता विचारात घेतली जाईल
- उमेदवाराने गेल्या तीन महिन्यांत Accenture भर्ती मूल्यांकन/मुलाखत प्रक्रियेसाठी हजर झालेले नसावे.
- उमेदवाराला 11 महिन्यांपेक्षा जास्त अनुभव नसावा.
नागरिकत्वाच्या आधारावर/संबंधित वर्क परमिट कागदपत्रे बाळगून उमेदवार भारतात काम करण्यास पात्र असले पाहिजेत. - कृपया लक्षात घ्या की भूतान आणि नेपाळचे नागरिक वर्क व्हिसा न घेता भारतात काम करू शकतात. इतर सर्व परदेशी नागरिकांना भारतात काम करण्यासाठी वर्क व्हिसा किंवा ओव्हरसीज सिटिझनशिप ऑफ इंडिया (OCI) किंवा पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन (PIO) कार्ड आवश्यक आहे.
- तुम्ही कंपनीमधील कोणत्याही बिझनेस युनिट/सर्व्हिस लाइनमध्ये काम करण्यास इच्छुक आहात
- तुम्ही भारतभरातील कोणत्याही Accenture कार्यालयात सामील होण्यास/जाण्यास इच्छुक आहात
- MBA/PGDBM उमेदवार या पदासाठी अर्ज करण्यास पात्र नाहीत
- Accenture ने कोणत्याही एजन्सी, कंपनी किंवा व्यक्तीला Accenture सोबत रोजगाराच्या बदल्यात पैसे गोळा करण्यासाठी किंवा कोणत्याही आर्थिक व्यवस्थेपर्यंत पोहोचण्यासाठी अधिकृत केलेले नाही.
टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.