माझी नोकरी : होम गार्ड नोंदणी 2024 ला सुरवात ; जाणून घ्या जिल्हानिहाय पदसंख्या आणि अर्ज प्रक्रिया | Home Guard Bharti 2024

ही जाहिरात शेअर करा 👇🏻

शासनातर्फे २०२४ च्या होमगार्ड नोंदणी प्रक्रियेस सुरवात झाली असून जिल्हा निहाय रिक्त पदांची यादी प्रदर्शित करण्यात आली आहे. या भरती संबंधीची संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे.

Maharashtra Home guard Recruitment Qualification / होम गार्ड भरती पात्रता निकष : 
  • शैक्षणिक पात्रता कमीत कमी १० वी उत्तीर्ण (SSC)
  • शारिरीक पात्रता –
    १. वय – २० वर्षे पुर्ण ते ५० वर्षांच्या आत. (दि.२४/०७/२०२४ रोजी)
    २. उंची पुरुषांकरीता – १६२ से. मी. महिलांकरीता १५० से. मी.
    ३. छाती (फक्त पुरुष उमेदवारांकरीता ) (न फुगविता किमान ७६ से.मी. कमीत कमी ५ सेमी फुगविणे आवश्यक)
  • आवश्यक कागदपत्र –
    १. रहीवाशी पुरावा आधारकार्ड, मतदान ओळखपत्र
    २. शेक्षणिक अहर्ता प्रमाणपत्र
    ३. जन्म दिनांक पुराव्याकरीता SSC बोर्ड प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला.
    ४. तांत्रिक अहर्ता धारण करीत असल्यास तत्सम प्रमाणपत्र.
    ५. खाजगी नोकरी करीत असल्यास मालकाचे ना-हरकत प्रमाणपत्र.
    ६. ३ महीन्याचे आतील पोलीस चारीत्र्य पडताळणी प्रमाणपत्र
Maharashtra Home guard Recruitment Selection Procedure / होम गार्ड भरती निवड प्रक्रिया : 

धावणे , गोळाफेक, इतर तांत्रिक गुणवतेच्या आधारावर निवड करण्यात येईल. या संबंधीची सविस्तर माहिती जाहिरातीमद्धे दिलेली आहे .

Maharashtra Home guard Recruitment Place of Work / होम गार्ड भरती नोकरीचे ठिकाण : 

तुमच्या जिल्हयासाठी अर्ज करू शकता,

Maharashtra Home guard Recruitment Age limit / होम गार्ड भरती वयोमर्यादा : 

20 ते 50 वर्षे .

Maharashtra Home guard Recruitment Application fee / होम गार्ड भरती अर्ज फी : 

फी नाही

Maharashtra Home guard Recruitment Salary / होम गार्ड भरती वेतन : 

होमगार्ड सदस्यांचे कर्तव्य होमगार्ड सदस्यांना दररोज कर्तव्य दिले जात नाही. होमगार्ड ना देय भत्ते होमगार्ड सदस्यांना बंदोबस्त काळात प्रतिदिन रु. ५७०/- कर्तव्य भत्ता व रु. १००/- उपहारभत्ता दिला जातो. तसेच प्रशिक्षणकाळात रु. ३५/- खिसाभत्ता व रु. १००/- भोजनभत्ता व साप्ताहिक कवायतीसाठी रु. ९०/- कवायत भत्ता दिला जातो.

Maharashtra Home guard Recruitment Application Procedure / होम गार्ड भरती अर्ज कसा भरावा : 
  • ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिली आहे.
  • वेबसाईट वर जाऊन फॉर्म काळजीपूर्वक भरा.
  • सर्व माहिती भरल्यावर कन्फर्म करून फॉर्म सबमिट करा.
  • फॉर्म ची प्रत सेव्ह करून ठेवा.
Maharashtra Home guard Recruitment Last Date / होम गार्ड भरती अर्ज भरायची अंतिम तारीख : 

जिल्हा निहाय अर्ज भरायची अंतिम तारीख वेबसाइट वर दिली आहे.

महत्वाच्या लिंक :

होम गार्ड भरती जिल्हा निहाय जाहिरात 

ऑनलाइन अर्जाची लिंक

होम गार्ड विषयीची इतर माहिती :

१. होमगार्ड सदस्यत्व : महाराष्ट्रातील होमगार्ड संघटनाही शासन संचलित पुर्णतः मानसेवी तत्वावर आधारीत आहे. या संघटनेचे सदस्य होणे म्हणजे कोणत्याही प्रकारची नोकरी अथवा रोजगार नाही. हे सदस्यत्व तीन वर्षांकरीता दिले जात असून आपण संघटनेसाठी दिलेल्या सेवेच्या गुणवत्तेवर पुढे ३३ वर्षांच्या टप्प्याने वयाच्या ५८ वर्षांपर्यंत पुननोंदणीकृत करता येते..

२. होमगार्ड सदस्यांचे कर्तव्य : होमगार्ड सदस्यांना दररोज कर्तव्य दिले जात नाही. पोलीस दलाच्या मागणी प्रमाणे कायदा व सुव्यवस्था राखणेकामी पोलीस दलासोबत बंदोबस्त कर्तव्य, आपतकालीन परिस्थितीमध्ये अग्निशमन, विमोचन, पूरविमोचन तसेच रोगराई / महामारी काळात, संपकाळात प्रशासनांस मदतकार्य अशी कर्तव्ये दिली जातात.

३. शास्ती : होमगार्ड सदस्यांना दररोज कर्तव्य दिले जात नाही परंतू अत्यावश्यक प्रसंगी बंदोबस्त कर्तव्याकरीता विनाकारण अनुपस्थित राहणाऱ्या / कर्तव्या मध्येकसूर करणाऱ्या / आदेशांचे पालन न करणाऱ्या होमगार्ड सदस्यांवर मुंबई होमगार्ड अधिनियम १९४७ कलम ७ (१) अन्वये बडतर्फ किंवा रु. २५०/- इतका दंड / तीन महीन्याची साधी कैद अशी शिक्षा करण्याची तरतूद आहे.

४. होमगार्ड सदस्यत्वाचे फायदे :
१. सैनिकी गणवेष परीधान करणेचा मान व विनाशुल्क सैनिकी प्रशिक्षण
२. ३ वर्षे सेवापुर्ण होमगार्डना राज्य पोलीस दल, वनविभाग, अग्निशमन दलामध्ये ५% आरक्षण.
३. प्रथमोपचार, अग्निशमन, विमोचन या सारख्या विषयांचे प्रशिक्षण घेण्याची संधी.
४. गौरवास्पद कामगिरी केल्यास विवीध पुरस्कार/पदके मिळविण्याची संधी.
५. स्वतःचा व्यवसाय/शेती इ. सांभाळत देशसेवा करण्याची संधी.

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.