सहयोग अर्बन को-ऑप बँक लि., उदगीर या बँकेत विविध पदांसाठी जागा भरावयाचे आहेत. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर फॉर्म भरावे.
पदाचे नाव | पदांची संख्या |
शाखाधिकारी / अधिकारी | 4 |
लिपिक | 6 |
सेवक | 4 |
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
शाखाधिकारी / अधिकारी | १) उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाचा किमान पदवीधर असावा. २) MBA Finance/M.Com उच्च पदवी, GDC & A/DCM/LLB असल्यास प्राधान्य. ३) किमान ५ वर्षे अधिकारी / शाखाधिकारी पदाचा अनुभव असणे आवश्यक. किमान वय २५ ते ५० वर्षे. |
लिपिक | १) उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाचा किमान पदवीधर असावा. २) B.Com / GDC & A/DCM उच्च पदवी असल्यास प्राधान्य. ३) किमान २ वर्षे कोणत्याही सरकारी, सहकारी, निमसरकारी वित्तीय विभागातील कामाचा अनुभव असणे आवश्यक. किमान वय २५ ते ३० वर्षे. |
सेवक | १) उमेदवार कोणत्याही शाखेचा किमान १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक. २) सर्व प्रकारचा रेकॉर्ड हाताळण्याचा अनुभव आवश्यक. ३) वाहन चालक परवानाधारकास प्राधान्य. |
इतर पात्रता निकष, कामाचे स्वरूप आणि अनुभव विषयी माहिती जाहिरातीमद्धे सविस्तर दिलेली आहे
निवड प्रक्रिया : प्राप्त झालेले अर्ज तपासण्यात येतील आणि उमेदवाराची गुणवत्ता, अनुभव आणि इतर निकषांच्या आधारावर मुलाखतीसाठी किंवा पुढील प्रक्रियेसाठी निवड करण्यात येईल.
नोकरीचे ठिकाण : उदगीर किंवा बॅंकच्या इतर शाखा
वयोमर्यादा : NA
अर्ज फी : NA
वेतन : बँकेच्या नियमांनुसार असेल.
अर्ज कसा भरावा :
- अर्ज ऑफलाइन पद्धतीने पाठवायचा आहे.
- तुमचा बायोडाटा निट भरून आवश्यक कागदपत्रे जोडून खालील पत्त्यावर किंवा ईमेल वर पाठवावा.
- पत्ता : सहयोग अर्बन को-ऑप बँक लि., उदगीर, शास्त्री कॉलनी, नवी आबादी, नगर परिषदेच्या पाठीमागे, उदगीर,
- ईमेल / फोन : ९६३७०००५११, / admin@sahyogbank.in
महत्वाच्या लिंक :
अर्ज भरायची अंतिम तारीख : 10/5/2024
इतर सूचना :
- वरील सर्व पदांना संगणक ज्ञान असणे आवश्यक.
- वाणिज्य शाखेतील पदवीधर व अनुभवी असणाऱ्यास प्राधान्य दिले जाईल. तसेच मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेचे चांगले ज्ञान असणे आवश्यक.
- मुलाखतीस येतानाचा सर्व खर्च उमेदवारांने करावयाचा आहे. तसेच मुलाखतीस येताना शैक्षणिक पात्रतेचे मूळ कागदपत्रे (Original) घेऊन येणे आवश्यक,
- बँकेच्या ज्या-ज्या ठिकाणी शाखा आहेत. तेथे काम करण्याची तयारी असणे आवश्यक आहे.
टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.