12 वी पास विद्यार्थ्यांसाठी खुशखबर…! यूपीएससी कडून नुकतीची NDA परीक्षेची घोषणा करण्यात आली आहे. या परीक्षेअंतर्गत सैन्याच्या तीनही दलांमध्ये तब्बल 400 हून अधिक जागा भरण्यात येणार आहेत. निवड झाल्यास ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर सैन्यात ऑफिसर म्हणून नेमणूक करण्यात येईल.
या भरतीयासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .
शैक्षणिक पात्रता :
- आर्मी विंग साठी कोणत्याही शाखेतून मान्यताप्राप्त बोर्डातून 12 वी (10+12) पास .
- एयर फोर्स आणि नावल विंग साठी सायन्स (PCM विषय घेऊन) शाखेतून 12 वी पास .
- फक्त अविवाहित असलेले पुरुष/महिला उमेदवार पात्र असतील.
निवड प्रक्रिया : निवड ऑनलाइन टेस्ट आणि त्यानंतर मुलाखतीद्वारे होईल. परीक्षेचे स्वरूप खालील प्रमाणे असेल. परीक्षेचा अभ्यासक्रम आणि इतर महितीसाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
मानसशास्त्रीय अभियोग्यता चाचणी आणि बुद्धिमत्ता चाचणीवर आधारित दोन-टप्प्यांची निवड प्रक्रिया निवड केंद्रे/वायुसेना निवड मंडळे/नौदल निवड मंडळांमध्ये होईल आहे. निवड केंद्रे/वायुसेना निवड मंडळे/नौदल निवड मंडळ येथे रिपोर्टिंगच्या पहिल्या दिवशी सर्व उमेदवारांना स्टेज-वन चाचणी दिली जाईल. पहिल्या टप्प्यात पात्र ठरलेल्या उमेदवारांनाच दुसऱ्या टप्प्यात/उर्वरित चाचण्यांमध्ये प्रवेश दिला जाईल. जे उमेदवार स्टेज II मध्ये पात्र ठरतील त्यांना मूळ प्रमाणपत्रे एका छायाप्रतीसह सादर करणे आवश्यक आहे.
नोकरीचे ठिकाण : ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर आवश्यकतेनुसार देशभर कुठेही,
वयोमर्यादा : उमेदवाराचा जन्म 2 जानेवारी 2006 ते 1 जानेवरी 2009 मधला असावा.
अर्ज फी :
- एससी / एसटी / महिला : फी नाही
- इतर प्रवर्ग : 100/-
वेतन : IMA मध्ये ट्रेनिंग सुरू असताना दर महिना Rs 56,100 वेतन देण्यात येईल. ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर लेफ्टनंट म्हणून नेमणूक होईल आणि वेतन Lt – Level 10 (56,100 – 1,77,500)/- नुसार असेल.
अर्ज कसा भरावा :
- ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिली आहे.
- न्यू युजर असल्यास वेबसाईट वर जाऊन वन टाइम रजिस्टर करा.
- संबंधित भरती निवडा आणि फॉर्म काळजीपूर्वक भरा. त्यानंतर फोटो सही आणि इतर कागदपत्रे अपलोड करा
- सर्व माहिती भरल्यावर कन्फर्म करून फॉर्म सबमिट करा.
- शेवटी पेमेंट करा आणि मग फॉर्म ची प्रत सेव्ह करून ठेवा.
महत्वाच्या लिंक :
अर्ज भरायची अंतिम तारीख : 4/6/2024 (6 PM)
इतर सूचना :
- परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी परीक्षेत प्रवेश घेण्यासाठी सर्व पात्रता अटींची पूर्तता केल्याची खात्री करावी.
- OTR मध्ये फेरफार करण्याची अंतिम तारीख 11.06.2024 असेल.
- वर नमूद केल्याप्रमाणे परीक्षा आयोजित करण्याची तारीख आयोगाच्या विवेकबुद्धीनुसार बदलली जाऊ शकते.
- रिक्त जागा तात्पुरत्या आहेत आणि राष्ट्रीय संरक्षण अकादमी आणि भारतीय नौदल अकादमीच्या प्रशिक्षण क्षमतेच्या उपलब्धतेनुसार बदलल्या जाऊ शकतात.
- उमेदवारांनी पूर्ण प्रशिक्षण पूर्ण होईपर्यंत लग्न न करण्याचे वचन दिले पाहिजे
- शालेय शिक्षण किंवा समकक्ष परीक्षेच्या 10+2 पॅटर्न अंतर्गत 12 वी मध्ये बसलेले उमेदवार देखील या परीक्षेसाठी अर्ज करू शकतात.
- अकरावीच्या असलेले उमेदवार या परीक्षेसाठी पात्र नाहीत.
टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.