पदवीधरांसाठी सैन्यात नोकरीची संधी; UPSC कडून 459 जागांसाठी CDS भरतीची घोषणा | UPSC CDS EXAMINATION 2024

ही जाहिरात शेअर करा 👇🏻

जर तुम्ही पदवीधर असाल आणि नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. यूपीएससी कडून नुकतीच CDS म्हणजे Combined Services Exam ची घोषणा करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत विविध सैन्यदलात एकूण 459 जागा भरण्यात येणार आहेत. या भरती संबंधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे.

upsc cds examination 2024 number of posts

शैक्षणिक पात्रता : 

  • I.M.A. and Officers’ Training Academy, Chennai – मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर.
  • Indian Naval Academy – मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील इंजिनियरिंग पदवीधर.
  • Air Force Academy –  मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील इंजिनियरिंग पदवीधर किंवा 12 वी  मध्ये Physics आणि Mathematics घेऊन कोणत्याही इतर शाखेतील पदवीधर.

निवड प्रक्रिया : निवड लेखी परीक्षा आणि इंटरव्ह्यु द्वारे होईल. परीक्षेचे स्वरूप खालील प्रमाणे असेल. सविस्तर माहिती जाहिरातीमध्ये दिलेली आहे.

upsc cds examination 2024 exam pattern

नोकरीचे ठिकाण : ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर आवश्यकतेनुसार देशभर कुठेही.

वयोमर्यादा : उमेदवाराचा जन्म 2 जुलै 2001  ते 1 जुलै 2006 मधला असावा.

अर्ज फी :

  • एससी / एसटी / महिला  : फी नाही
  • इतर प्रवर्ग : 200/-

वेतन : IMA मध्ये ट्रेनिंग सुरू असताना दर महिना Rs 56,100 वेतन देण्यात येईल. ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर वेतन Lt – Level 10 (56,100 – 1,77,500)/- नुसार असेल.

अर्ज कसा भरावा : 

  • ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिली आहे.
  • न्यू युजर असल्यास वेबसाईट वर जाऊन वन टाइम रजिस्टर करा.
  • संबंधित भरती निवडा आणि फॉर्म काळजीपूर्वक भरा. त्यानंतर फोटो सही आणि इतर कागदपत्रे अपलोड करा
  • सर्व माहिती भरल्यावर कन्फर्म करून फॉर्म सबमिट करा.
  • शेवटी पेमेंट करा आणि मग फॉर्म ची प्रत सेव्ह करून ठेवा.

महत्वाच्या लिंक :

UPSC अधिसूचना जाहिरात 

ऑनलाइन अर्जाची लिंक

अर्ज भरायची अंतिम तारीख : 4/6/2024 (6 PM)

इतर सूचना : 

  1. परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी परीक्षेत प्रवेश घेण्यासाठी सर्व पात्रता अटींची पूर्तता केल्याची खात्री करावी.
  2. ओएमआर शीट (उत्तरपत्रिका) मध्ये उत्तरे लिहिणे आणि चिन्हांकित करणे या दोन्हीसाठी उमेदवारांनी फक्त काळ्या बॉल पेनचा वापर करणे आवश्यक आहे.
  3. परीक्षेसाठी प्रवेश घेतलेल्या उमेदवारांना वेळापत्रक आणि ठिकाण किंवा परीक्षेच्या ठिकाणांची माहिती दिली जाईल. उमेदवारांनी नोंद घ्यावी की केंद्र बदलण्याची कोणतीही विनंती मान्य केली जाणार नाही.
  4. 25 वर्षांपेक्षा कमी वयाचा उमेदवार अविवाहित असावा. प्रशिक्षणादरम्यान लग्नाला परवानगी नाही.
  5. एकदा भरलेले शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही किंवा फी इतर कोणत्याही परीक्षा किंवा निवडीसाठी राखीव ठेवली जाऊ शकत नाही.
  6. उमेदवारांनी स्वतःच्या हाताने कागदपत्रे लिहावीत. त्यांना कोणत्याही परिस्थितीत लेखकाची मदत घेतली जाणार नाही.

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.