मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत नोकरीची संधी; ज्यु. ट्रांसलेटर व इंटरप्रीटर पदांसाठी भरती. | Bombay High Court Recruitment 

ही जाहिरात शेअर करा 👇🏻

मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत औरंगाबाद खंडपीठात ज्यु. ट्रांसलेटर व इंटरप्रीटर पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे.

शैक्षणिक पात्रता : 

  • मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर ; लॉ पदवी असल्यास प्राधान्य.
  • इंग्लिश सोबत हिंदी, मराठी, गुजराती आणि कोकणी यांपैकी एका भाषेचे ज्ञान असणे आवश्यक.
  • MS-CIT किंवा समतुल्य संगणक कोर्स पूर्ण असावा.

कामाचे स्वरूप : ज्यु. ट्रांसलेटर व इंटरप्रीटर यांच्या कार्यामध्ये माननीय न्यायालयाच्या निर्देशांनुसार मराठी, हिंदी, गुजराती भाषांमध्ये विविध/अनेक कार्यवाहीमध्ये न्यायालयात सादर केलेल्या प्रशस्तिपत्रांचे इंग्रजी भाषेत भाषांतर करणे आणि अशी कर्तव्ये पार पाडणे यांचा समावेश होतो. रजिस्ट्रार आणि/किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळोवेळी निर्देशित केल्याप्रमाणे काम करणे. उमेदवारांना साधारणपणे सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या वेळेत काम करावे लागते. आणि या तासांच्या पलीकडेही अत्यावश्यक परिस्थितीत आणि निबंधक / वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार काम करावे लागते.

निवड प्रक्रिया : निवड लेखी आणि तोंडी परीक्षेद्वारे होईल. लेखी परीक्षेचे स्वरूप खालील प्रमाणे असेल. अधिक महितीसाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत नोकरीची संधी; ज्यु. ट्रांसलेटर व इंटरप्रीटर पदांसाठी भरती. | Bombay High Court Recruitment 

नोकरीचे ठिकाण : औरंगाबाद  खंडपीठ, आणि खंडपीठाच्या अंतर्गत येणारी विविध न्यायालये.

वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे

अर्ज फी : Rs. 200/-

अर्जाची फी SBI कलेक्ट द्वारे भरायची आहे. या संबंधीच्या अधिक महितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा. फी भरल्यावर त्याची रिसीप्ट सेव करून ठेवा.

वेतन : Pay Matrix = S-18 : Rs. 49,100-1,55,800/-

अर्ज कसा भरावा : 

  • ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिली आहे.
  • वेबसाईट वर जाऊन न्यू युजर असल्यास रजिस्टर करा.
  • नंतर फॉर्म काळजीपूर्वक भरा. त्यानंतर फोटो सही आणि इतर कागदपत्रे अपलोड करा
  • SBI कलेक्ट द्वारे पेमेंट केलेला रिसीप्ट नंबर भरा. सर्व माहिती भरल्यावर कन्फर्म करून फॉर्म सबमिट करा.
  • फॉर्म ची प्रत सेव्ह करून ठेवा.

महत्वाच्या लिंक :

मुंबई उच्च न्यायालय अधिसूचना जाहिरात 

ऑनलाइन अर्जाची लिंक

अर्ज भरायची अंतिम तारीख : 29/05/2024

इतर सूचना :  

  1. नियुक्ती दोन वर्षांच्या कालावधीसाठी तात्पुरती आहे
  2. निवड समिती, मुंबई उच्च न्यायालय, औरंगाबाद येथील खंडपीठ, उमेदवार निवडण्यासाठी योग्य पद्धत किंवा पद्धती अवलंबण्याचा अधिकार राखून ठेवते,
  3. संगणकीकृत प्रोग्रामद्वारे अर्जांची छाननी केली जाईल. म्हणून, उमेदवाराने ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी कनिष्ठ अनुवादक आणि दुभाषी या पदासाठी संपूर्ण तपशीलवार जाहिरात वाचली पाहिजे.
  4. अर्ज फीसाठी ऑनलाइन पेमेंट केल्याशिवाय, जाहिरात केलेल्या पोस्टसाठी ऑनलाइन अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  5. विवाहित महिला उमेदवाराने तिच्या माध्यमिक शाळेच्या प्रमाणपत्रावर दिसत असल्याप्रमाणे तिच्या पहिल्या नावाने ऑनलाइन अर्ज भरावा.
  6. निवड यादीतील कोणताही उमेदवार नियुक्ती आदेशात नमूद केलेल्या कालावधीत कर्तव्यात सामील होण्यात अपयशी ठरल्यास, त्याचे/तिचे नाव निवड यादीतून काढून टाकले जाईल.

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.