नेव्हल डॉकयार्ड को-ऑप बँक लिमिटेड ही एक सहकारी बँक आहे, जी नेव्हल डॉकयार्ड, मुंबई येथे स्थित आहे. या बँकेची स्थापना 1949 साली झाली होती. या बँकेचा मुख्य उद्देश नेव्हल डॉकयार्डच्या कर्मचार्यांना वित्तीय सेवा पुरवणे हा आहे. बँकेच्या विविध सेवांमध्ये बचत खाते, चालू खाते, कर्ज सुविधा, ठेवी आणि इतर वित्तीय सेवा समाविष्ट आहेत. नेव्हल डॉकयार्ड को-ऑप बँक लिमिटेड ही आपल्या विश्वसनीय सेवा आणि उत्कृष्ट ग्राहकसेवेच्या आधारे प्रगत होत आहे.
नेव्हल डॉकयार्ड को-ऑप बँकेत क्लार्कच्या २० पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .
शैक्षणिक पात्रता :
- मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 60% गुणांसह पदवी, कॉमर्स शाखेतील B. Com, BCA, ВВА and BMS पदविधारकांना प्राध्यान.
- संगणकाचे आणि आयटी चे ज्ञान असणे आवश्यक.
निवड प्रक्रिया : प्राप्त झालेले अर्ज तपासण्यात येतील आणि उमेदवाराची गुणवत्ता, अनुभव आणि इतर निकषांच्या आधारावर मुलाखतीसाठी किंवा पुढील प्रक्रियेसाठी निवड करण्यात येईल.
नोकरीचे ठिकाण : नेव्हल डॉकयार्ड को-ऑप बँक, फोर्ट मुंबई
वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षे
अर्ज फी : फी नाही
वेतन : बँकेच्या नियमांनुसार असेल.
अर्ज कसा भरावा :
- अर्जाचा नमूना जाहिरातीमद्धे दिलेला आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज नीट भरून त्याची स्कॅन कॉपी आवश्यक कागदपत्रे जोडून recruitment@navalbank.com या ईमेल आयडी वर पाठवावा.
महत्वाच्या लिंक :
नेव्हल डॉकयार्ड को-ऑप बँक अधिसूचना जाहिरात
अर्ज भरायची अंतिम तारीख : 1/7/2024
इतर सूचना :
- स्कॅन केलेला अर्ज विहित नमुन्यातील कागदपत्रांसह वरील ईमेल आयडीवर पाठवावा.
- OBC/SC/ST उमेदवारांसाठी महाराष्ट्र सरकारच्या नियमांनुसार वयात सवलत आहे.
- कोणतेही कारण न देता अपूर्ण अर्ज आपोआप नाकारला जाईल.
- पोस्टाने/व्यक्तीद्वारे प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- अर्ज करण्यापूर्वी आपण सर्व पात्रता निकषांची पूर्तता करतोय याची खात्री करावी.
- शिवेटच्या तारखेपर्यंत न थांबता अर्ज लवकरात लवकर भरावा.
- उशिरा आलेले अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत.
- संस्थेच्या आवश्यकतेनुसार पदांची संख्या कमी किंवा वाढू शकते.
- भरती संबंधीच्या कोणत्याही भुल थापांना बळी पडू नये
टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.