जर तुम्ही पदवीधर असाल आणि नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी चालून आलेली आहे. इंस्टीट्यूट ऑफ बैंकिंग पर्सोनेल सिलेक्शन म्हणजेच IBPS द्वारे देशभरातील विविध सरकारी बँकांमध्ये दहा हरजाराहून अधिक पदांसाठी मेगा भरती घेण्यात येणार आहे. या भरती संबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .
पदाचे नाव | पदांची संख्या |
ऑफिस असिस्टंट (मल्टी परपोस) | 5709 |
ऑफिसर स्केल – I | 3551 |
ऑफिसर स्केल – II (जनरल बँकिंग ऑफिसर) | 496 |
ऑफिसर स्केल – II (IT) | 104 |
ऑफिसर स्केल – II (CA) | 60 |
ऑफिसर स्केल – II (लॉ) | 30 |
ऑफिसर स्केल – II ( ट्रेशरी मॅनेजर) | 21 |
ऑफिसर स्केल – II ( मार्केटिंग ऑफिसर ) | 11 |
ऑफिसर स्केल – II ( ॲग्रिकल्चर ऑफिसर) | 70 |
ऑफिसर स्केल – III | 129 |
जात आणि बँक निहाय पदांची संख्या जाहिरातीमद्धे दिलेली आहे.
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
ऑफिस असिस्टंट (मल्टी परपोस) | मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर. स्थानिक भाषेचे ज्ञान संगणकाचे ज्ञान |
ऑफिसर स्केल – I | मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी किंवा कृषी, फलोत्पादन, वनीकरण, पशुसंवर्धन, पशुवैद्यकीय विज्ञान, कृषी अभियांत्रिकी, मत्स्यपालन, कृषी विपणन आणि सहकार, माहिती तंत्रज्ञान, व्यवस्थापन, कायदा, अर्थशास्त्र किंवा अकाउंटन्सी या विषयांतील पदवी असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. स्थानिक भाषेचे ज्ञान संगणकाचे ज्ञान |
ऑफिसर स्केल – II (जनरल बँकिंग ऑफिसर) | मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी किंवा बँकिंग, वित्त, विपणन, कृषी, फलोत्पादन, वनीकरण, पशुसंवर्धन, पशुवैद्यकीय विज्ञान, कृषी अभियांत्रिकी, मत्स्यपालन, कृषी विपणन आणि सहकार, माहिती तंत्रज्ञान, व्यवस्थापन, कायदा, अर्थशास्त्र आणि लेखाशास्त्र या विषयांतील पदवी असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. स्थानिक भाषेचे ज्ञान संगणकाचे ज्ञान |
ऑफिसर स्केल – II (IT) | मान्यताप्राप्त विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स / कम्युनिकेशन / कॉम्प्युटर सायन्स / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मधे किमान ५०% गुणांसह पदवी. ASP, PHP, C++, Java , VB, VC, OCP मधे सर्टिफिकेट असल्यास प्राधान्य. |
ऑफिसर स्केल – II (CA) | CA पदवी |
ऑफिसर स्केल – II (लॉ) | मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान ५०% गुणांसह लॉ पदवी. |
ऑफिसर स्केल – II ( ट्रेशरी मॅनेजर) | मान्यताप्राप्त विद्यापीठातून CA किंवा MBA (फायनान्स) पदवी. |
ऑफिसर स्केल – II ( मार्केटिंग ऑफिसर ) | मान्यताप्राप्त विद्यापीठातून मार्केटिंग मधे MBA |
ऑफिसर स्केल – II ( ॲग्रिकल्चर ऑफिसर) | मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान ५०% गुणांसह कृषी/ फलोत्पादन/ दुग्धव्यवसाय/ पशुसंवर्धन/ वनीकरण/ पशुवैद्यकीय विज्ञान/ कृषी अभियांत्रिकी/ मत्स्यपालन मधे पदवी. |
ऑफिसर स्केल – III | मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी किंवा बँकिंग, वित्त, विपणन, कृषी, फलोत्पादन, वनीकरण, पशुसंवर्धन, पशुवैद्यकीय विज्ञान, कृषी अभियांत्रिकी, मत्स्यपालन, कृषी विपणन आणि सहकार, माहिती तंत्रज्ञान, व्यवस्थापन, कायदा, अर्थशास्त्र आणि लेखा विषयांतील पदवी असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. |
इतर पात्रता निकष, कामाचे स्वरूप आणि अनुभव विषयी माहिती जाहिरातीमद्धे सविस्तर दिलेली आहे
निवड प्रक्रिया : निवड प्रक्रिया ऑनलाइन टेस्ट द्वारे होईल. परीक्षेचे स्वरूप खालील प्रमाणे असेल.
ऑफिसर स्केल I , II , III साठी मेन एक्झॅम नंतर मुलाखत घेण्यात येईल.
नोकरीचे ठिकाण : निवडलेल्या बॅंकच्या शाखांनुसार
वयोमर्यादा :
पदाचे नाव | वयोमर्यादा |
ऑफिस असिस्टंट (मल्टी परपोस) | 18 ते 28 वर्षे |
ऑफिसर स्केल – I | 18 ते 30 वर्षे |
ऑफिसर स्केल – II (जनरल बँकिंग ऑफिसर) | 21 ते 32 वर्षे |
ऑफिसर स्केल – II (IT) | 21 ते 32 वर्षे |
ऑफिसर स्केल – II (CA) | 21 ते 32 वर्षे |
ऑफिसर स्केल – II (लॉ) | 21 ते 32 वर्षे |
ऑफिसर स्केल – II ( ट्रेशरी मॅनेजर) | 21 ते 32 वर्षे |
ऑफिसर स्केल – II ( मार्केटिंग ऑफिसर ) | 21 ते 32 वर्षे |
ऑफिसर स्केल – II ( ॲग्रिकल्चर ऑफिसर) | 21 ते 32 वर्षे |
ऑफिसर स्केल – III | 21 ते 40 वर्षे |
अर्ज फी :
ऑफिस असिस्टंट (मल्टी परपोस)
- एससी / एसटी / दिव्यांग : Rs.175/-
- इतर प्रवर्ग : Rs.850/-
ऑफिसर स्केल I , II , III
- एससी / एसटी / दिव्यांग / ESM / DESM : Rs.175/-
- इतर प्रवर्ग : Rs.850/-
वेतन : बँकांच्या नियमांनुसार असेल.
अर्ज कसा भरावा :
- ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिली आहे.
- वेबसाईट वर जाऊन न्यू युजर असल्यास Click here for New Registration वर क्लिक करा आणि रजिस्टर करा.
- नंतर फॉर्म काळजीपूर्वक भरा. त्यानंतर फोटो सही आणि इतर कागदपत्रे अपलोड करा
- सर्व माहिती भरल्यावर कन्फर्म करून फॉर्म सबमिट करा.
- शेवटी पेमेंट करा आणि मग फॉर्म ची प्रत सेव्ह करून ठेवा.
महत्वाच्या लिंक :
ऑनलाइन अर्जाची लिंक
अर्ज भरायची अंतिम तारीख : 27/06/2024
इतर सूचना :
- उमेदवारांना अधिकारी संवर्गातील स्केल-I, II आणि III या एकाच पदासाठी अर्ज करण्याचा सल्ला दिला जातो. अधिकारी संवर्गातील एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे अर्ज सरसकट नाकारले जातील.
- ऑनलाइन परीक्षा आणि/किंवा मुलाखतीत एकापेक्षा जास्त हजेरी/हजेरी सरसरीपणे नाकारली जाईल/उमेदवारी रद्द केली जाईल.
- भरती प्रक्रियेसह या अधिसूचनेमुळे उद्भवणारे कोणतेही परिणामी विवाद मुंबई येथील न्यायालयांच्या एकमेव अधिकारक्षेत्राच्या अधीन असतील.
- कोणताही प्रचार करणे किंवा अनुचित फायद्यासाठी प्रभाव निर्माण करणे निवड प्रक्रियेतून अपात्र ठरेल.
- ऑनलाइन परीक्षा (प्राथमिक, मुख्य आणि एकल) आणि सामायिक मुलाखतीची तारीख, वेळ आणि स्थळ बदलण्याची कोणतीही विनंती मान्य केली जाणार नाही.
- पत्ता बदलण्याची कोणतीही विनंती, ऑनलाइन अर्जात नमूद केलेल्या तपशीलांवर विचार केला जाणार नाही.
- कोणतेही निकष, निवड पद्धत आणि तात्पुरती वाटप इत्यादी बदलण्याचा (रद्द/सुधारित/जोडण्याचा) अधिकार IBPS राखून ठेवते.
- CRP RRBs- XIII साठी ऑनलाइन अर्जामध्ये नोंदणीकृत ईमेल आयडी आणि मोबाइल नंबरवरच सूचना ईमेल आणि/किंवा एसएमएसद्वारे पाठवल्या जातील.
टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.