माझी नोकरी : नाबार्ड बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; विविध शाखांतील ग्रेड A पदांसाठी भरती. | NABARD Grade A Recruitment 2024

ही जाहिरात शेअर करा 👇🏻

नाबार्ड (राष्ट्रीय कृषि आणि ग्रामीण विकास बँक) ही भारत सरकारची एक प्रमुख संस्था आहे, जी ग्रामीण भागातील आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी कार्य करते. नाबार्डची स्थापना 12 जुलै 1982 रोजी झाली. या बँकेचे मुख्यालय मुंबईत आहे आणि तिचे उद्दिष्ट ग्रामीण भागातील शेती, लघुउद्योग, हस्तशिल्प, व ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारण्याचे आहे. नाबार्ड विविध विकास योजना, कर्ज सुविधा आणि तांत्रिक साहाय्य पुरवून ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासात महत्त्वाची भूमिका बजावते.

नाबार्ड मध्ये विविध १०२ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .

पदाचे नावपदांची संख्या
जनरल50
चार्टर्ड अकांऊटंट4
फायनान्स7
कॉम्प्युटर / IT16
ऍग्रिकल्चर2
ॲनिमल हजबंडरी2
फीशरी1
फूड प्रोसेसिंग1
फॉरेस्ट्री2
प्लांटेशन अँड होरीकल्चर1
जियो इन्फॉर्मेटिक्स1
डेव्हलपमेंट मॅनेजमेंट3
Statistics2
सिव्हिल इंजिनिअरिंग3
इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग1
इंव्हेरनमेंटल इंजिनिअरिंग/ सायन्स2
ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट2
AM राजभाषा2
NABARD Recruitment Qualification / नाबार्ड भरती शैक्षणिक पात्रता : 

निवडीस पात्र असण्यासाठी संबंधित शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे. पद निहाय शैक्षणिक पात्रता निकष यासंबधीची संपूर्ण माहिती जाहिरातीमद्धे दिलेली आहे .

NABARD Recruitment Selection Procedure / नाबार्ड भरती निवड प्रक्रिया : 

निवड खालील प्रमाणे ४ टप्प्यात होईल.

  1. प्राथमिक परीक्षा (Preliminary Examination) : प्रीलीमचे स्वरूप खालीलप्रमाणे असेल. Nabard Preliminary Examination Pattern
  2. प्रीलीमनंतर मेन्स एक्झॅम असेल.
  3. मेन्स मध्ये पास झालेल्या उमेदवारांची सायकोमेट्रिक टेस्ट घेण्यात येईल. ही टेस्ट बहुपर्यायी असेल आणि ९० मिनिट वेळ असेल.
  4. शेवटी मुलाखत घेण्यात येईल.
NABARD Recruitment Place of Work / नाबार्ड भरती नोकरीचे ठिकाण : 

आवश्यकतेनुसार देशभर कुठेही.

NABARD Recruitment Age limit / नाबार्ड भरती वयोमर्यादा : 

२१ ते ३० वर्षे .

NABARD Recruitment Application fee / नाबार्ड भरती अर्ज फी : 
  • एससी / एसटी / दिव्यांग  : १५०/-
  • इतर प्रवर्ग : ८५०/-
NABARD Recruitment Salary / नाबार्ड भरती वेतन : 

सुरवातीचे वेतन ४४,५०० असेल त्याच बरोबर इतर भत्ते आणि सुविधा देण्यात येतील.

NABARD Recruitment Application Procedure / नाबार्ड भरती अर्ज कसा भरावा : 
  1. ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिली आहे.
  2. वेबसाईट वर जाऊन न्यू युजर असल्यास रजिस्टर करा.
  3. नंतर फॉर्म काळजीपूर्वक भरा. त्यानंतर फोटो सही आणि इतर कागदपत्रे अपलोड करा
  4. सर्व माहिती भरल्यावर कन्फर्म करून फॉर्म सबमिट करा.
  5. शेवटी पेमेंट करा आणि मग फॉर्म ची प्रत सेव्ह करून ठेवा.
NABARD Recruitment Last Date / नाबार्ड भरती अर्ज भरायची अंतिम तारीख : 

१५/०८/२०२४

महत्वाच्या लिंक :

नाबार्ड अधिसूचना जाहिरात 

ऑनलाइन अर्जाची लिंक

इतर सूचना : 
  1. ऑनलाइन चाचणीसाठी (फेज I, II आणि III) कॉल लेटर डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांना नाबार्डच्या वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
  2. कॉल लेटरवर नमूद केलेली रिपोर्टिंग वेळ चाचणी सुरू होण्याच्या वेळेपूर्वीची आहे
  3. प्रत्येक शिफ्टसाठी परीक्षा हॉलमध्ये, तसेच मुलाखतीच्या वेळी, मूळ कॉल लेटर आणि उमेदवाराच्या सध्याच्या वैध फोटो ओळखीची छायाप्रत आवश्यक आहे.
  4. कोणत्याही अर्जदाराला परीक्षा हॉलमध्ये कॅल्क्युलेटर, मोबाईल फोन, ब्लू टूथ उपकरणे किंवा इतर कोणतेही साधन/उपकरण/गॅझेट वापरण्याची किंवा ताब्यात घेण्याची परवानगी नाही.
  5. केवळ ग्रामीण भागासह भारतात कुठेही सेवा करण्यास इच्छुक असलेल्या अर्जदारांनाच अर्ज करावा लागेल.
  6. निवडलेल्या अर्जदारांची नियुक्ती बँकेने नियुक्त केलेल्या/मान्यता दिलेल्या वैद्यकीय अधिका-यांद्वारे वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त घोषित केल्याच्या अधीन आहे.
  7. मुख्य परीक्षेपासून बायोमेट्रिक डेटा (अंगठ्याचा ठसा) आणि उमेदवारांचा फोटो कॅप्चर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.