Majhi Naukri : नागरी सहकारी बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; विविध जिल्ह्यात कनिष्ठ लिपिक पदांसाठी भरती. | MUCBF Clerk Bharti

ही जाहिरात शेअर करा 👇🏻

महाराष्ट्र राज्यातील जळगाव व नाशिक जिल्हा कार्यक्षेत्रात एकूण ७ शाखांद्वारे कार्यरत असलेल्या व सुमारे २०७.२७ कोटी रुपयांचा व्यवसाय असणाऱ्या जळगाव स्थित एका अग्रगण्य नागरी सहकारी बँकेत ‘कनिष्ठ लिपिक’ या पदाकरिता दि महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँक्स् फेडरेशन लि., मुंबई यांचे माध्यमातून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत,

या भरती  संबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .

Urban co-op bank Federation Recruitment Qualification / नागरी सहकारी बँक भरती शैक्षणिक पात्रता : 
  1. मान्यताप्राप्त विद्यापिठाची पदवी
  2. MS-CIT किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक (equivalent certification course)
Urban co-op bank Federation Recruitment Selection Procedure / नागरी सहकारी बँक भरती निवड प्रक्रिया : 
  • कनिष्ठ लिपिक पदाकरिता १०० गुणांची इंग्रजी व मराठी भाषेतून बहुपर्यायी स्वरुपाची लेखी परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येईल. बहुपर्यायी स्वरुपाच्या प्रश्नांमध्ये संख्यात्मक आणि गणिती क्षमता, इंग्रजी भाषा आणि व्याकरण, संगणक आणि सहकार ज्ञान, बौधिक चाचणी, बँकिंग आणि सामान्य ज्ञान या विषयांवरील प्रश्नांचा समावेश असेल. तद्नंतर १०० पैकी प्राप्त गुणांचे ९० च्या गुणोत्तरामध्ये रुपांतर करण्यात येईल. सदर पदाकरिता घेण्यात येणाऱ्या ऑफलाईन परीक्षेचे स्वरुप पुढीलप्रमाणे असेलःMajhi Naukri : नागरी सहकारी बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; विविध जिल्ह्यात कनिष्ठ लिपिक पदांसाठी भरती. | MUCBF Clerk Bharti
  • कागदपत्रके पडताळणी : उमेद्वारास ऑफलाईन परीक्षेतील गुणांच्या उतरत्या क्रमवारीनुसार बँक धोरणाप्रमाणे मुलाखतीपूर्वी शैक्षणिक व इतर संबंधित मूळ प्रमाणपत्रकांची प्राथमिक कागदपत्रके पडताळणीसाठी बोलविण्यात येईल. त्यावेळी उमेद्वाराने मूळ कागदपत्रके उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. प्राथमिक कागदपत्रके पडताळणीमध्ये पात्र होणाऱ्या उमेद्वारास बँक धोरणाप्रमाणे बँकेकडून मुलाखतीस बोलविण्यात येईल.
  • मुलाखत : कनिष्ठ लिपिक पदाकरिता उत्तीर्ण होणाऱ्या उमेद्वारांना बँकेच्या धोरणानुसार भरावयाचे पदसंख्येच्या प्रमाणात ऑफलाईन परीक्षेच्या गुणानुक्रमे मौखिक मुलाखतीस बोलविण्यात येईल. मौखिक मुलाखतीकरिता १० गुण (शैक्षणिक पात्रतेकरिता ५ गुण व मौखिक मुलाखतीकरिता ५ गुण) राहतील. मुलाखतीस गैरहजर राहिल्यास संबंधित उमेद्वार अंतिम निवडीस (परीक्षेत उत्तीर्ण झालेला असला तरी) पात्र राहणार नाही.
Urban co-op bank Federation Recruitment Place of Work / नागरी सहकारी बँक भरती नोकरीचे ठिकाण : 

जळगाव, नाशिक, बुलढाणा, छत्रपती संभाजी नगर, धुळे

Urban co-op bank Federation Recruitment Application fee / नागरी सहकारी बँक भरती अर्ज फी : 

परीक्षा शुल्क रु. १,०००/- अधिक १८% जी.एस.टी. असे एकूण रु. १,१८०/- (विना परतावा)

Urban co-op bank Federation Recruitment Salary / नागरी सहकारी बँक भरती वेतन : 

दर महा – 20,760 /-

Urban co-op bank Federation Recruitment Application Procedure / नागरी सहकारी बँक भरती अर्ज कसा भरावा : 
  • ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिली आहे.
  • वेबसाईट वर जाऊन न्यू युजर असल्यास रजिस्टर करा.
  • नंतर फॉर्म काळजीपूर्वक भरा. त्यानंतर फोटो सही आणि इतर कागदपत्रे अपलोड करा
  • सर्व माहिती भरल्यावर कन्फर्म करून फॉर्म सबमिट करा.
  • शेवटी पेमेंट करा आणि मग फॉर्म ची प्रत सेव्ह करून ठेवा.
Urban co-op bank Federation Recruitment Last Date / नागरी सहकारी बँक भरती अर्ज भरायची अंतिम तारीख : 

07/09/2024

महत्वाच्या लिंक :

अधिसूचना जाहिरात 

ऑनलाइन अर्जाची लिंक

इतर सूचना : 
  1. परीक्षा शुल्क तसेच अर्ज शुल्क संकेतस्थळावर अद्ययावत केल्याशिवाय रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होणार नाही.
  2. उमेद्वाराकडे वैध ई-मेल आयडी व मोबाईल क्रमांक असावा, जो निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैध आणि सक्रिय राहिला पाहिजे.
  3. सदर भरती प्रक्रियेदरम्यान संकेतस्थळावर असलेल्या सूचनांचे वेळोवेळी अवलोकन व पालन करुन भरती प्रक्रियेची अद्ययावत माहिती प्राप्त करण्याची जबाबदारी उमे‌द्वाराची राहील.
  4. कनिष्ठ लिपिक पदाकरिता उमेद्वाराची बहुपर्यायी प्रश्नांची परीक्षा ही ऑनलाईन अर्जात नमुद केलेल्या पात्रतेनुसार कोणत्याही कागदपत्रकांची पूर्व तपासणी/छाननी न करता घेण्यात येणार असल्याने, या परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेद्वारांना निवडीबाबत कोणताही हक्क राहणार नाही.
  5. उमेद्वारांना ऑफलाईन परीक्षा/कागदपत्रके पडताळणी व प्रत्यक्ष मुलाखतीस स्वखर्चाने उपस्थित रहावे लागेल. ८) परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेद्वारांची मुलाखतीद्वारे निवड केली जाईल.
  6. अपात्र उमेद्वारांना त्यांचे परीक्षा शुल्क परत दिले जाणार नाही.
  7. कनिष्ठ लिपिक पदाकरिता परीक्षेची वेळ उमे‌द्वारांना फेडरेशनच्या संकेतस्थळावर कळविण्यात येईल.
  8. मुलाखतीचे वेळापत्रक उमे‌द्वारांना फेडरेशनच्या संकेतस्थळावर कळविण्यात येईल.
  9. उमेद्वाराने अर्जात नमूद केलेली सर्व माहिती व तपशील अचूक असावा. सदर माहिती अथवा तपशील चूकीचा अथवा खोटा आढळल्यास सदर उमेद्वाराचा अर्ज नोकरभरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल,

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.