देशातील प्रमुख सरकारी बँकांपैकी एक असणार्या आयडीबीआय बँकेत असिस्टेंट जनरल मॅनेजर आणि मॅनेजर पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .
पदाचे नाव | पदांची संख्या |
असिस्टेंट जनरल मॅनेजर | 25 |
मॅनेजर | 31 |
IDBI Recruitment Qualification / IDBI बँक भरती शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
असिस्टेंट जनरल मॅनेजर | मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदव्यूत्तर पदवी. संबंधित कामाचा किमान ७ वर्षांचा अनुभव. |
मॅनेजर | मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदव्यूत्तर पदवी. संबंधित कामाचा किमान ४ वर्षांचा अनुभव |
इतर पात्रता निकष, कामाचे स्वरूप आणि अनुभव विषयी माहिती जाहिरातीमद्धे सविस्तर दिलेली आहे
IDBI Recruitment Selection Procedure / IDBI बँक भरती निवड प्रक्रिया :
प्राप्त झालेले अर्ज तपासण्यात येतील आणि उमेदवाराची गुणवत्ता, अनुभव आणि इतर निकषांच्या आधारावर मुलाखतीसाठी किंवा पुढील प्रक्रियेसाठी निवड करण्यात येईल.
IDBI Recruitment Place of Work / IDBI बँक भरती नोकरीचे ठिकाण :
आवश्यकतेनुसार देशभर कुठेही.
IDBI Recruitment Age limit / IDBI बँक भरती वयोमर्यादा :
पदाचे नाव | वयोमर्यादा |
असिस्टेंट जनरल मॅनेजर | २८ ते ४० वर्षे |
मॅनेजर | २५ ते ३५ वर्षे |
IDBI Recruitment Application fee / IDBI बँक भरती अर्ज फी :
- एससी / एसटी : 200/-
- इतर प्रवर्ग : 1000/-
IDBI Recruitment Salary / IDBI बँक भरती वेतन :
पदाचे नाव | वेतन |
असिस्टेंट जनरल मॅनेजर | ₹ 1,57,000 |
मॅनेजर | ₹ 1,19,000 |
IDBI Recruitment Application Procedure / IDBI बँक भरती अर्ज कसा भरावा :
- IDBI बँक भरतीच्या ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिली आहे.
- वेबसाईट वर जाऊन न्यू युजर असल्यास रजिस्टर करा.
- नंतर फॉर्म काळजीपूर्वक भरा. त्यानंतर फोटो सही आणि इतर कागदपत्रे अपलोड करा
- सर्व माहिती भरल्यावर कन्फर्म करून फॉर्म सबमिट करा.
- शेवटी पेमेंट करा आणि मग फॉर्म ची प्रत सेव्ह करून ठेवा
IDBI Recruitment Last Date / IDBI बँक भरती अर्ज भरायची अंतिम तारीख :
१५/०९/२०२४
महत्वाच्या लिंक :
इतर सूचना :
- ऑनलाइन अर्ज सबमिट करण्यापूर्वी, उमेदवारांनी सर्व पात्रता निकषांची पूर्तता केल्याची खात्री करणे आवश्यक आहे
- आयडीबीआय बँकेच्या वेबसाइटद्वारे केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर केले जावेत
- पात्रता निकषांसह भरती प्रक्रियेतील कोणत्याही किंवा सर्व तरतुदी रद्द/सुधारणा/दुरुस्ती करण्याचा अधिकार बँकेकडे आहे.
- बँक स्वतःच्या विवेकबुद्धीनुसार, केंद्र किंवा ठिकाण किंवा विशिष्ट उमेदवार आणि/किंवा सर्व केंद्रे किंवा सर्व उमेदवारांच्या संदर्भात आवश्यक असल्यास, निवड प्रक्रिया पुन्हा धारण करू शकते.
- बँक उमेदवारांना सर्वांचे मार्कशीट/स्कोअर कार्ड आणि/किंवा कोणतीही निवड प्रक्रिया देऊ करणार नाही.
- अर्ज करण्याच्या पात्रतेबद्दल सल्ला घेणाऱ्या उमेदवारांकडून किंवा कोणत्याही पात्र आणि निवडलेल्या उमेदवारांकडून बँक विनंत्या स्वीकारणार नाही.
- कोणत्याही स्वरूपात प्रचार करणे ही अपात्रता असेल.
टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.