नोकरीच्या शोधात असणाऱ्या पदवीधरांसाठी खुश खबर. IBPS तर्फे बहुप्रतिक्षित IBPS PO भरतीची घोषणा करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत प्रोबेशनरी ऑफिसर आणि मॅनेजमेंट ट्रेनी पदांच्या तब्बल 4455 जागा भरण्यात येणार आहेत. या भरती संबंधीची संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे
बँक नुसार पदांची संख्या खाली दिलेली आहे.
बँक | पदांची संख्या |
बँक ऑफ बडोदा | प्रलंबित |
बँक ऑफ इंडिया | 885 |
बँक ऑफ महाराष्ट्र | प्रलंबित |
कॅनरा बँक | 750 |
सेंट्रल बँक ऑफ इंडिया | 2000 |
भारतीय बँक | प्रलंबित |
इंडियन ओव्हरसीज बँक | 260 |
पंजाब नॅशनल बँक | 200 |
पंजाब आणि सिंद बँक | 360 |
युको बँक | प्रलंबित |
युनियन बँक ऑफ इंडिया | प्रलंबित |
एकूण | 4455 |
IBPS PO Recruitment Qualification / IBPS PO भरती शैक्षणिक पात्रता :
मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर.
IBPS PO Recruitment Selection Procedure / IBPS PO भरती निवड प्रक्रिया :
- सर्वप्रथम प्रिलीम एक्झॅम घेण्यात येईल. या परीक्षेचे स्वरूप खालील प्रमाणे असेल.
- प्रिलीम एक्झॅम मध्ये पात्र झालेल्या उमेदवारांची मेन एक्झॅम साठी निवड करण्यात येईल. या परीक्षेचे स्वरूप खालील प्रमाणे असेल.
- मेन एक्झॅम मध्ये पात्र झालेल्या उमेदवारांची संबंधित बँक द्वारे मुलाखत घेण्यात येईल आणि अंतिम निवड करण्यात येईल.
IBPS PO Recruitment Place of Work / IBPS PO भरती नोकरीचे ठिकाण :
निवड झालेल्या बँकच्या शाखा/कार्यालये
IBPS PO Recruitment Age limit / IBPS PO भरती वयोमर्यादा :
२० ते ३० वर्षे
IBPS PO Recruitment Application fee / IBPS PO भरती अर्ज फी :
- एससी / एसटी / दिव्यांग / कंपनीचे कर्मचारी : १७५/-
- इतर प्रवर्ग : ८५०/-
IBPS PO Recruitment Salary / IBPS PO भरती वेतन :
संबंधित बॅंकच्या नियमांनुसार असेल. (सुरवातीला संभाव्य वेतन 52,000 ते 55,000 असेल )
IBPS PO Recruitment Application Procedure / IBPS PO भरती अर्ज कसा भरावा :
- ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिली आहे.
- वेबसाईट वर जाऊन न्यू युजर असल्यास रजिस्टर करा.
- नंतर फॉर्म काळजीपूर्वक भरा. त्यानंतर फोटो सही आणि इतर कागदपत्रे अपलोड करा
- सर्व माहिती भरल्यावर कन्फर्म करून फॉर्म सबमिट करा.
- शेवटी पेमेंट करा आणि मग फॉर्म ची प्रत सेव्ह करून ठेवा
IBPS PO Recruitment Last Date / IBPS PO भरती अर्ज भरायची अंतिम तारीख :
२१ / ०८ / २०२४
महत्वाच्या लिंक :
इतर सूचना :
- ऑनलाइन प्राथमिक परीक्षेदरम्यान कॉल लेटर आणि फोटो आयडी पुराव्याची प्रत परीक्षा केंद्रावर जमा केली जाणार नाही
- ऑनलाइन मुख्य परीक्षेच्या वेळी ऑनलाइन प्राथमिक परीक्षेचे ऑथेंटिकेटेड/स्टँम्प केलेले कॉल लेटर आणि आयडी प्रूफची ऑथेंटिकेटेड/स्टॅम्प केलेली छायाप्रत घेऊन येणार नाही अशा उमेदवारांना परीक्षेला बसू दिले जाणार नाही.
- या पदासाठी अर्ज करण्यापूर्वी, उमेदवाराने हे सुनिश्चित केले पाहिजे की तो/तिने या अधिसूचनेत नमूद केलेले पात्रता निकष आणि इतर निकषांची पूर्तता केली आहे.
- ज्या उमेदवारांना IBPS द्वारे केलेल्या संप्रेषणाच्या संदर्भात विशिष्ट कालावधीसाठी CRP परीक्षेत बसण्यास प्रतिबंधित करण्यात आले आहे ते त्यानुसार कार्य करू शकतात.
- कोणत्याही उमेदवाराने एकापेक्षा जास्त अर्ज सादर करू नयेत
- ऑनलाइन परीक्षा आणि/किंवा मुलाखतीत एकापेक्षा जास्त हजेरी/हजेरी सरसरीपणे नाकारली जाईल/उमेदवारी रद्द केली जाईल.
- या सूचनेमुळे उद्भवणारे कोणतेही परिणामी विवाद यासह
भरती प्रक्रिया ही मुंबई येथील न्यायालयांच्या एकमेव अधिकारक्षेत्राच्या अधीन असेल. - कोणताही प्रचार करणे किंवा अनुचित फायद्यासाठी प्रभाव निर्माण करणे निवड प्रक्रियेतून अपात्र ठरेल.
- ऑनलाइन परीक्षा (प्राथमिक आणि मुख्य) आणि मुलाखतीची तारीख, वेळ आणि स्थळ बदलण्याची कोणतीही विनंती मान्य केली जाणार नाही.
- पत्ता बदलण्याची कोणतीही विनंती, ऑनलाइन अर्जात नमूद केलेल्या तपशीलांवर विचार केला जाणार नाही.
टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.