विविध शाखांतील पदवीधरांसाठी नोकरीची संधी; IBPS अंतर्गत स्केल – १ ऑफिसर पदांसाठी मेगा भरती. | IBPS SO 2024

ही जाहिरात शेअर करा 👇🏻

नोकरीच्या शोधात असणाऱ्या पदवीधरांसाठी खुश खबर. IBPS तर्फे बहुप्रतिक्षित IBPS SO (स्पेशालिस्ट ऑफिसर) भरतीची घोषणा करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत विविध शाखांतील तब्बल ९००० हून अधिक पदे भरण्यात येणार आहेत.
या भरती संबंधीची संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे.

पदाचे नावपदांची संख्या
आयटी ऑफिसर170
ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर346
राजभाषा अधिकारी25
लॉ ऑफिसर125
HR / पर्सनल ऑफिसर25
मार्केटिंग ऑफिसर205
IBPS SO Recruitment Qualification / IBPS SO भरती शैक्षणिक पात्रता :
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
आयटी ऑफिसरजाहिराती मध्ये दिलेल्या कोणत्याही शाखेतून इंजिनिअरिंग पदवी किंवा पदव्युत्तर.
ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसरॲग्रिकल्चर मधे ४ वर्षांची पदवी किंवा जाहिराती मध्ये दिलेल्या इतर शाखांमधील पदवी.
राजभाषा अधिकारीपदवी पर्यंत इंग्रजी विषय घेऊन हिंदी मध्ये पदव्युत्तर  किंवा हिंदी आणि इंग्रजी विषय घेऊन पदवी आणि संस्कृत मध्ये पदव्युत्तर.
लॉ ऑफिसरलॉ मधे पदवी आणि बार कौन्सिल रजिस्ट्रेशन.
HR / पर्सनल ऑफिसरपदवी आणि पर्सनल मॅनेजमेंट/ इंडस्ट्रिअल रिलेशन्स/ HR/ HRD / सोशल वर्क / लेबर लॉ मधे डिप्लोमा किंवा पदव्युत्तर..
मार्केटिंग ऑफिसरपदवीधर आणि MMS/ MBA मार्केटिंग/ PGDBA/ PGDBM / PGPM/ PGDM
 
IBPS SO Recruitment Selection Procedure / IBPS SO भरती निवड प्रक्रिया : 
  • सर्वप्रथम प्रिलीम एक्झॅम घेण्यात येईल. या परीक्षेचे स्वरूप खालील प्रमाणे असेल.

राजभाषा अधिकारी

 प्रिलीम एक्झॅम – राजभाषा अधिकारी

प्रिलीम एक्झॅम इतर पदे

प्रिलीम एक्झॅम – इतर पदे

  • प्रिलीम एक्झॅम मध्ये पात्र झालेल्या उमेदवारांची मेन एक्झॅम साठी निवड करण्यात येईल. या परीक्षेचे स्वरूप खालील प्रमाणे असेल.विविध शाखांतील पदवीधरांसाठी नोकरीची संधी; IBPS अंतर्गत स्केल - १ ऑफिसर पदांसाठी मेगा भरती. | IBPS SO 2024

 

  • मेन एक्झॅम मध्ये पात्र झालेल्या उमेदवारांची संबंधित बँक द्वारे मुलाखत घेण्यात येईल आणि अंतिम निवड करण्यात येईल.
IBPS SO Recruitment Place of Work / IBPS SO भरती नोकरीचे ठिकाण : 

निवड झालेल्या बँकच्या शाखा/कार्यालये

IBPS SO Recruitment Age limit / IBPS SO भरती वयोमर्यादा : 

२० ते ३० वर्षे

IBPS SO Recruitment Application fee / IBPS SO भरती अर्ज फी : 
  • एससी / एसटी / दिव्यांग  : १७५/-
  • इतर प्रवर्ग : ८५०/-
IBPS SO Recruitment Salary / IBPS SO भरती वेतन : 

46,000 to Rs. 48,000 (संभाव्य )

IBPS SO Recruitment Application Procedure / IBPS SO भरती अर्ज कसा भरावा : 
  • ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिली आहे.
  • वेबसाईट वर जाऊन न्यू युजर असल्यास रजिस्टर करा.
  • नंतर फॉर्म काळजीपूर्वक भरा. त्यानंतर फोटो सही आणि इतर कागदपत्रे अपलोड करा
  • सर्व माहिती भरल्यावर कन्फर्म करून फॉर्म सबमिट करा.
  • शेवटी पेमेंट करा आणि मग फॉर्म ची प्रत सेव्ह करून ठेवा
IBPS SO Recruitment Last Date / IBPS SO भरती अर्ज भरायची अंतिम तारीख : 

२१ / ०८ / २०२४

महत्वाच्या लिंक :

IBPS SO अधिसूचना जाहिरात 

ऑनलाइन अर्जाची लिंक

इतर सूचना : 
  1. ऑनलाइन प्राथमिक परीक्षेदरम्यान कॉल लेटर आणि फोटो आयडी पुराव्याची प्रत परीक्षा केंद्रावर जमा केली जाणार नाही
  2. ऑनलाइन मुख्य परीक्षेच्या वेळी ऑनलाइन प्राथमिक परीक्षेचे ऑथेंटिकेटेड/स्टँम्प केलेले कॉल लेटर आणि आयडी प्रूफची ऑथेंटिकेटेड/स्टॅम्प केलेली छायाप्रत घेऊन येणार नाही अशा उमेदवारांना परीक्षेला बसू दिले जाणार नाही.
  3. या पदासाठी अर्ज करण्यापूर्वी, उमेदवाराने हे सुनिश्चित केले पाहिजे की तो/तिने या अधिसूचनेत नमूद केलेले पात्रता निकष आणि इतर निकषांची पूर्तता केली आहे.
  4. ज्या उमेदवारांना IBPS द्वारे केलेल्या संप्रेषणाच्या संदर्भात विशिष्ट कालावधीसाठी CRP परीक्षेत बसण्यास प्रतिबंधित करण्यात आले आहे ते त्यानुसार कार्य करू शकतात.
  5. कोणत्याही उमेदवाराने एकापेक्षा जास्त अर्ज सादर करू नयेत
  6. ऑनलाइन परीक्षा आणि/किंवा मुलाखतीत एकापेक्षा जास्त हजेरी/हजेरी सरसरीपणे नाकारली जाईल/उमेदवारी रद्द केली जाईल.
  7. या सूचनेमुळे उद्भवणारे कोणतेही परिणामी विवाद यासह
    भरती प्रक्रिया ही  मुंबई येथील न्यायालयांच्या एकमेव अधिकारक्षेत्राच्या अधीन असेल.

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.