महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद अंतर्गत नोकरीची संधी; लिपिक आणि लघुलेखक पदांसाठी भरती.| MSCE Pune Recruitment 2024

ही जाहिरात शेअर करा 👇🏻

शिक्षण आयुक्तालय (राज्यस्तरावरील कार्यालयातील पदे) स्तरावर सध्याच्या मंजूर असलेल्या पदांपैकी रिक्त असलेल्या ८० टक्के प्रमाणे पदे भरण्यात येत आहेत. ही भूतपूर्व दुय्यम सेवा मंडळाच्या सेवा कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षे बाहेरील) गट-क संवर्गातील असून सदर पदभरती परीक्षा ही महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील उपलब्ध केंद्रांवर घेण्यात येणार आहे. त्यानुसार सदर परीक्षेसाठी ऑनलाईन पध्दतीने आवेदनपत्र पात्र उमेदवारांकडून मागविण्यात येत आहेत तसेच परीक्षेचा दिनांक यथावकाश संकेतस्थळावर कळविण्यात येईल.
या भरतीसंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .

पदाचे नावपदांची संख्या
मुख्य लिपिक6
वरिष्ठ लिपिक14
निम्नश्रेणी लघुलेखक3

 

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
मुख्य लिपिक•मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण.
• टंकलेखन / संगणक टंकलेखन मराठी ३० श.प्र.मि. व इंग्रजी ४० श.प्र.मि. शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.
• मुख्य लिपिक पदासाठी किमान दोन वर्षाचा शासकीय/ निमशासकीय कार्यालयातील वरिष्ठ लिपिक पदाचा अनुभव आवश्यक.
• वरिष्ठ लिपिक पदासाठी किमान दोन वर्षाचा शासकीय निमशासकीय कार्यालयातील कनिष्ठ लिपिक / लिपिक नि टंकलेखन पदाचा अनुभव.
• एम.एस.सी.आय.टी. परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे.
वरिष्ठ लिपिक
निम्नश्रेणी लघुलेखक• मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण.
• टंकलेखन / संगणक टंकलेखन मराठी ३० श.प्र.मि., इंग्रजी ४० श.प्र.मि. व इंग्रजी व मराठी लघुलेखन १०० श.प्र.मि. चे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.
• एम.एस.सी.आय.टी. परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे,

 

निवड प्रक्रिया : 

  • परीक्षा ही ऑनलाईन (Computer Based Test) पध्दतीने घेण्यात येईल. परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या असतील. प्रश्नपत्रिकेत प्रत्येक प्रश्नास ०१ गुण असेल.परीक्षेचे स्वरूप खालील प्रमाणे असेल.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद अंतर्गत नोकरीची संधी; लिपिक आणि लघुलेखक पदांसाठी भरती.| MSCE Pune Recruitment 2024

  • परीक्षेचा कालावधी – १२० मिनिटे असेल
  • ज्या पदांकरिता पदवी ही कमीतकमी अर्हता आहे, अशा पदांकरिता परीक्षेचा दर्जा भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठांच्या पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील. परंतू त्यापैकी मराठी व इंग्रजी या विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (इयत्ता १२ वी दर्जाच्या) समान राहील.

नोकरीचे ठिकाण : पुणे

वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे

अर्ज फी : 

  • खुल्या संवर्गातील उमेदवार (अराखीव): रु. ९५०/-
  • मागासवर्गीय / आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक / अनाथ / दिव्यांग उमेदवार रु. ८५०/-

वेतन : दिलेल नाही

अर्ज कसा भरावा : 

  • ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिली आहे. निवड IBPS द्वारे होणार आहे.
  • वेबसाईट वर जाऊन Click here for New Registration वर क्लिक करा. तुमचं पासपोर्ट साईज फोटो, स्वाक्षरी, डाव्या हाताच्या अंगठ्याची निशाणी, स्व-हस्ताक्षरातील प्रतिज्ञापत्र उपलोड करा.
  • इच्छुक असलेल्या पदा सिलेक्ट करा.
  • नंतर फॉर्म काळजीपूर्वक भरा. सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
  • सर्व माहिती भरल्यावर कन्फर्म करून फॉर्म सबमिट करा.
  • शेवटी पेमेंट करा आणि मग फॉर्म ची प्रत सेव्ह करून ठेवा.

महत्वाच्या लिंक :

MSCE पुणे अधिसूचना जाहिरात 

ऑनलाइन अर्जाची लिंक

अर्ज भरायची अंतिम तारीख : 8/4/2024

इतर सूचना : 

  1. अर्ज फक्त ऑनलाईन प्रणालीव्दारे स्वीकारण्यात येतील.
  2. उमेदवाराने पात्रतेनुसार प्राधान्यक्रम निवडावे.
  3. वेळोवेळी शासन निर्णय व आरक्षण धोरणात बदल झाल्यास ते यथा नियम लागू राहिल.
  4. ८.१ पदसंख्या व आरक्षणामध्ये शासनाच्या संबंधित विभागांच्या सूचनेनुसार बदल / वाढ होण्याची शक्यता आहे.
  5. अर्ज केलेला उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा राहिवासी असावा व त्याच्याकडे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  6. उमेदवाराने अर्ज केला अथवा विहित अर्हता धारण केली म्हणजे परीक्षेला बोलविण्याचा अथवा नियुक्तीचा हक्क प्राप्त झाला असे नाही.
  7. आरक्षित मागास प्रवर्गाचा दावा करणाऱ्या उमेदवारांना ज्या संदर्भातील सक्षम अधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र (Cast Certificate) व उपलब्ध असल्यास जात वैधता प्रमाणपत्र (Validity Certificate) निवडीअंती सादर करणे आवश्यक आहे.
  8. उमेदवारांना परीक्षेसाठी स्वखर्चाने उपस्थित रहावे लागेल. परीक्षेसाठी नेमून दिलेल्या परीक्षा केंद्रावर दिलेल्या वेळेपूर्वी ०१ तास ३० मिनिटे (९० मिनिटे) अगोदर उपस्थित रहावे.
  9. विहित मुदतीत परीक्षा शुल्काचा भरणा करु न शकलेल्या उमेदवारांचा संबंधित परीक्षेसाठी विचार केला जाणार नाही.
  10. अर्ज सादर करतांना ३ (तीन) जिल्हा / परीक्षा केंद्रांची निवड करणे अनिवार्य – आहे. जिल्हा / परीक्षा केंद्र बदलाबाबतची विनंती कोणत्याही परीस्थितीत अथवा कोणत्याही कारणास्तव मान्य करण्यात येणार नाही. एखादे जिल्हा / परीक्षा केंद्र कार्यान्वित होऊ शकले नाही अथवा एखाद्या जिल्हा / परीक्षा केंद्रावर उमेदवारांना प्रवेश देण्याची क्षमता ओलांडली गेली तर ते जिल्हा / परीक्षा केंद्र निवडलेल्या उमेदवारांची बैठक व्यवस्था दुसऱ्या जिल्हा / परीक्षा केंद्रावर करण्यात येईल.
  11. परीक्षेसाठी प्रविष्ठ होणाऱ्या उमेदवारांची प्रवेशपत्रे www.mscepune.in संकेतस्थळावर विशिष्ट लिंकव्दारे उपलब्ध करून देण्यात येतील. त्याची प्रत परीक्षेपूर्वी डाऊनलोड करून घेणे व परीक्षेच्यावेळी उमेदवारांनी सादर करणे आवश्यक आहे. त्याशिवाय परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही.
  12. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली माहिती / जाहिरात अधिकृत समजण्यात येईल.
  13. सदर परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करतांना उमेदवारांना काही अडचण उद्भवल्यास bpvmscepune२०२३@gmail.com या इमेल वर संपर्क साधता येईल.

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.