पुणे मर्चेंटस् को-ऑप बँक ही असलेल्या पुणे जिल्ह्यासह, रायगड जिल्हा, ठाणे जिल्हा व सातारा जिल्ह्यात सेवा देणारी अग्रेसर को-ऑप बँक असून 370 कोटीहून अधिक व्यवसाय साध्य केलेला आहे.
पुणे मर्चेंटस् को-ऑप बँकेत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .
पदाचे नाव | पदांची संख्या |
मुख्य कार्यकारी अधिकारी | १ |
सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी | २ |
शाखाधिकारी | १३ |
शिपाई/ड्रायव्हर | ४ |
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
मुख्य कार्यकारी अधिकारी | १) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी. २) बँकिंग क्षेत्रातील सिनियर पदाचा कमीत कमी ८ वर्षाचा अनुभव आवश्यक, JAIIB/CAIIB/Diploma in Banking & Finance / Diploma in Co-operative Management/DCBM/GDC & A यापैकी उत्तीर्ण किंवा चार्टड/कॉस्ट अकौंटंट असल्यास प्राधान्य. रिझर्व्ह बँकेच्या फीट अॅण्ड प्रॉपर निकषानुसार पात्र असणे आवश्यक राहील. |
सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी | १) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी. २) बँकिंग क्षेत्रातील अकौंट विभाग/कर्ज विभाग/गुंतवणूक विभाग इ. चा कमीत कमी ५ वर्षाचा अनुभव आवश्यक. ३)JAIIB/CAIIB/Diploma in Banking & Finanance / Diploma in Co-operative Management/DCBM/GDC &A यापैकी उत्तीर्ण असल्यास प्राधान्य. |
शाखाधिकारी | १) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी. २) पदव्युत्तर पदवी तसेच शासन मान्यताप्राप्त इतर संस्थांची (ICM, IIBF, VAMNICOM इ.) बैंकिंग / सहकार / कायदेविषयक पदविका सहकारी बँकेतील किमान ५ वर्षाचा ऑफीसर/शाखाधिकारी पदाचा अनुभव आवश्यक. ३) MS-CIT/समतुल्य प्रमाणपत्र आवश्यक. JAIIB/CAIIB/Diploma in Banking & Finance / Diploma in Co-operative Management/DCBM/GDC & A यापैकी उत्तीर्ण असल्यास प्राधान्य |
शिपाई/ड्रायव्हर | १) १० वी उत्तीर्ण, मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेचे पुरेसे ज्ञान आवश्यक. २) तीन चाकी/चार चाकी वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक |
निवड प्रक्रिया :
प्राप्त झालेले अर्ज तपासण्यात येतील आणि उमेदवाराची गुणवत्ता, अनुभव आणि इतर निकषांच्या आधारावर मुलाखतीसाठी किंवा फुढील प्रक्रियेसठि निवड करण्यात येईल.
नोकरीचे ठिकाण : पुणे किंवा अन्य जिल्ह्यात
वयोमर्यादा :
पदाचे नाव | वयोमर्यादा |
मुख्य कार्यकारी अधिकारी | ३५ ते ४० वर्षे |
सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी | ३५ ते ४० वर्षे |
शाखाधिकारी | ३० वर्षे |
शिपाई/ड्रायव्हर | २१ ते ३० वर्षे |
अर्ज फी : NA
वेतन : बँकेच्या नियमांनुसार देण्यात येईल.
अर्ज कसा भरावा : इच्छुक उमेदवारांनी त्यांचे अर्ज आवश्यक कागदपत्रांसोबत career@pmcbl.com या ईमेल आयडी वर किंवा खालील पत्त्यावर पाठवावे .
पत्ता : मुख्य कार्यालय: २५७, बुधवार पेठ, श्री शिवाजी रोड, श्रीमंत दगडुशेठ गणपती मंदिरासमोर, पुणे ४११००२.
(अर्जाच्या पाकीटावर कोणत्या पदाकरीता अर्ज करीत आहे याचा स्पष्ट उल्लेख करावा)
महत्वाच्या लिंक :
पुणे मर्चेंटस् को-ऑप बँक अधिसूचना जाहिरात
अर्ज भरायची अंतिम तारीख : वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध झालेल्या दिनांकापासून २० दिवसांच्या आत
टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.