Majhi Naukri : BMC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; कार्यकारी सहाय्यकच्या १८४६ पदांसाठी मेगा भरती.  | BMC Karyakari Sahayak Bharti 2024

ही जाहिरात शेअर करा 👇🏻

मा. महानगरपालिका आयुक्त यांच्या मंजुरी क्र. एमजीएफ/एफ/3604 दि.24.06.2024 नुसार, बृहन्मुंबई महानगरपालिकेतील विविध खात्याच्या आस्थापनेवरील गट-क मधील “कार्यकारी सहायक” (पूर्वीचे पदनामः लिपिक) या संवर्गातील 1846 रिक्त पदे सरळसेवेने भरावयाची आहेत. या भरती संबंधीची माहिती खाली देण्यात आलेली आहे.

BMC Karyakari Sahayak Bharti 2024

BMC Executive Assistant Recruitment nature of duties / BMC कार्यकारी सहाय्यक भरती कामाचे स्वरूप : 

विविध प्रकारची कारकुनी कर्तव्ये पार पाडणे म्हणजेच, अभिलेख परीरक्षित करणे, टपाल स्विकारणे व पाठविणे, नियमित स्वरुपाचे पत्रव्यवहार करणे, विविध प्रकारची माहिती तयार करणे, विविध प्रकारचे वेळापत्रक तयार करणे, वेतन देयके, विमा आणि भविष्य निर्वाह निधी खाते संबंधित कामे पार पाडणे, वेतनपत्रकाशी संबंधित कामे पार पाडणे, अर्थसंकल्पाशी संबंधित कामकाज पार पाडणे, ग्रंथालयातील पुस्तके स्विकृती व दिल्याच्या नोंदी ठेवणे, साधन सामुग्रीची मागणी व वाटप करणे, लिलाव केलेल्या वस्तुंचे खाते / नोंदवही परिरक्षित करणे, जकात-कराचे परिगणन करणे व अधिदान घेणे / करणे, संबंधित न्यायालयीन कामकाजासाठी उपस्थित रहाणे, निम्नसंवर्गातील कर्मचाऱ्यांना कार्य सोपविणे व त्यांच्या कामावर देख-रेख ठेवणे, पार पाडलेली कामे तपासून वरिष्ठांना सादर करणे इ. स्वतः टंकलेखनाची काम करणे, संगणक व लेख यंत्र हाताळणे,

BMC Executive Assistant Recruitment Qualification / BMC कार्यकारी सहाय्यक भरती शैक्षणिक पात्रता : 
  1. उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असावा.
    आणि
  2. उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य, विज्ञान, कला, विधी किंवा तत्सम शाखांचा पदवीधर असावा आणि प्रथम प्रयत्नात किमान 45% गुणांसह उत्तीर्ण असावा.
    किंवा
  3. ज्या मान्यताप्राप्त विद्यापिठामध्ये सत्र पद्धत अवलंबिली जात असेल त्या विद्यापिठातील उमेदवाराची टक्केवारी खालीलप्रमाणे गणण्यात येऊन, सदर टक्केवारी 45% गुणांसह प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
BMC Executive Assistant Recruitment Selection Procedure / BMC कार्यकारी सहाय्यक भरती निवड प्रक्रिया : 
  1. “कार्यकारी सहायक” (पूर्वीचे पदनामः लिपिक) पदाच्या सेवा प्रवेश नियमानुसार विहीत केलेली अर्हता व अटी-शर्ती धारण करीत असलेल्या पात्र उमेदवारांची बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाइन परीक्षा, संगणकावर घेण्यात येईल. सदर परीक्षेत प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे तयार करण्यात आलेल्या गुणवत्ता यादीतील उमेदवारांमधून विहीत सामाजिक / समांतर आरक्षणानुसार निवडयादी तयार करण्यात येईल.
  2. “कार्यकारी सहायक” (पूर्वीचे पदनामः लिपिक) पदासाठी बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाइन परीक्षेच्या प्रश्नप्रत्रिकेचा दर्जा, पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील. परंतु, त्यापैकी मराठी व इंग्रजी या विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (इ.12 वी) दर्जाच्या समान राहील. सदर पदाकरिता घेण्यात येणाऱ्या बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाइन परीक्षेचे स्वरूप पुढीलप्रमाणे असेलः- BMC Karyakari Sahayak Bharti 2024
BMC Executive Assistant Recruitment Place of Work / BMC कार्यकारी सहाय्यक भरती नोकरीचे ठिकाण : 

मुंबई

BMC Executive Assistant Recruitment Age limit / BMC कार्यकारी सहाय्यक भरती वयोमर्यादा : 
  • अराखीव (खुला) प्रवर्गातील उमेदवारांसाठी – किमान 18 वर्षे व कमाल 38 वर्षे
  • मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी – किमान 18 वर्षे व कमाल 43 वर्षे
BMC Executive Assistant Recruitment Application fee / BMC कार्यकारी सहाय्यक भरती अर्ज फी : 
  • अराखीव (खुला) प्रवर्गातील उमेदवारांकरिता – रु.1000/- (वस्तु व सेवाकरासह)
  • ‘मागास प्रवर्गातील’ उमेदवारांकरिता – रु.900/- (वस्तु व सेवाकरासह)
BMC Executive Assistant Recruitment Salary / BMC कार्यकारी सहाय्यक भरती वेतन : 

स्तर-M15- रू. 25,500-81,100

BMC Executive Assistant Recruitment Application Procedure / BMC कार्यकारी सहाय्यक भरती अर्ज कसा भरावा : 
  • ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिली आहे.
  • वेबसाईट वर जाऊन न्यू युजर असल्यास New Registration वर क्लिक करा आणि रजिस्टर करा.
  • नंतर फॉर्म काळजीपूर्वक भरा. त्यानंतर फोटो सही आणि इतर कागदपत्रे अपलोड करा
  • सर्व माहिती भरल्यावर कन्फर्म करून फॉर्म सबमिट करा.
  • शेवटी पेमेंट करा आणि मग फॉर्म ची प्रत सेव्ह करून ठेवा.
BMC Executive Assistant Recruitment Last Date / BMC कार्यकारी सहाय्यक भरती अर्ज भरायची अंतिम तारीख : 

09th September 2024, 23:59 PM

महत्वाच्या लिंक :

BMC कार्यकारी सहाय्यक भरती अधिसूचना जाहिरात

ऑनलाइन अर्जाची लिंक

इतर सूचना : 
  1. भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किंवा घट होण्याची शक्यता आहे.
  2. रिक्त पदांच्या संख्येत बदल करण्याबाबत तसेच सामाजिक व समांतर आरक्षण बदलण्याचे अधिकार किंवा भरती प्रक्रिया कोणत्याही टप्प्यावर अंशतः किंवा पूर्णतः रद्द करण्याचे अधिकार आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका यांना राहतील. याबाबत कोणालाही कोणताही वाद उपस्थित करता येणार नाही.
  3. सामाजिक व अन्य समांतर आरक्षणाची पदे भरण्यासाठी शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयाप्रमाणे कार्यवाही केली जाईल.
  4. दिव्यांग उमेदवारांनी सदर पदाची कर्तव्ये, जबाबदारी, अपेक्षित शारिरीक क्षमता /पात्रता याबाबतची अपेक्षा दर्शविणारी माहिती संदर्भित करुन त्याप्रमाणे अर्ज करणे आवश्यक आहे. 40% पेक्षा कमी दिव्यांगत्व असलेल्या उमेदवाराने दिव्यांग आरक्षणांतर्गत नियुक्तीसाठी अर्ज केल्यास अशा उमेदवारांना अपात्र ठरविण्यात येईल.
  5. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील (ईडब्ल्यूएस) उमेदवारांकरिता वित्तीय वर्ष 2022-2023 /2023-2024 करिता महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र. राआधो-4019/प्र.क्र.31/16 अ दि.12.02.2019 व दि.31.05.2021 अन्वये विहीत करण्यात आलेली कागदपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करणे आवश्यक राहील.
  6. एका उमेदवारास एकच अर्ज सादर करता येईल. कोणत्याही उमेदवाराने एकापेक्षा जास्त वेळेस अर्जाची नोंदणी केली असल्यास, त्यामधील अर्जाची / फी भरल्याची विवरणे समान असल्यास फक्त शेवटची नोंदणी ग्राह्य धरण्यात येईल व इतर नोंद झालेल्या अर्जाची फी जप्त करण्यात येईल.
  7. मागास प्रवर्गातील उमेदवारांना खुल्या प्रवर्गामध्ये भरतीकरिता अर्ज करण्याची मुभा राहील. परंतु, एकाच उमेदवाराचे एकापेक्षा जास्त अर्ज विचारात घेता येणार नाहीत.

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.