माझी नोकरी : नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ६८० पदांसाठी भरती.

ही जाहिरात शेअर करा 👇🏻

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग मंत्रालय यांच्या अधिनस्त असलेल्या नागपूर जिल्हयातील शासकीय वैद्यकीय । दंत । आयुर्वेद महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयातील गट ड (वर्ग-४) संवर्गातील समकक्ष रिक्त पदे भरण्याकरीता ऑनलाइन (Computer Based Test) स्पर्धा परीक्षेसाठी अर्हता प्राप्त उमेदवारांकडून विहित नमुण्यात अर्ज मागविण्यात येत आहे उमेदवाराची शैक्षणिक अर्हता, पदांचा तपशिल, शासनाच्या नियमानुसार संवैधानिक आरक्षण व समांतर आरक्षण, स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम आणि अर्ज करण्यासाठी मार्गदर्शक सुचना इत्यादीवी सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.

माझी नोकरी : नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ६८० पदांसाठी भरती.

अर्ज भरायची अंतिम तारीख : 20/01/2024

शैक्षणिक पात्रता : 

  • उमेदवार 10 वी पास असणे आवश्यक
  • मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक

निवड प्रक्रिया :

या भरती मधे निवड ऑनलाईन टेस्ट द्वारे होणार आहे.

परीक्षेचे स्वरूप

  • मराठी : प्रश्न २५/गुण ५०
  • इंग्रजी : प्रश्न २५/गुण ५०
  • सामान्य ज्ञान : प्रश्न २५/गुण ५०
  • बौद्धिक चाचणी / अंक गणित : प्रश्न २५/गुण ५०
  • एकूण गुण : प्रश्न १००/ गुण २००

परीक्षा कालावधी : २ तास

नोकरीचे ठिकाण : नागपूर जिल्ह्यातील शासकीय विद्यालये व संलग्न रुग्णालये

वयोमर्यादा : १८ ते ३८ वर्षे (खुला गट)

इतर वर्गांसाठीच्या वयोमर्यादे साठी जाहिरात वाचा.

अर्ज फी : 

खुला प्रवर्ग : १०००

राखीव गट : ९००

पगार : १५०००-४७६०० + महागाई भत्ता व इता भत्ते

अर्ज कसा भरावा :

  1. अर्ज फक्त ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे स्वीकारण्यात येतील
  2. उमेदवारास फक्त एकच अर्ज सादर करता येईल. वेगवेगळ्या संस्थे करीता वेगवेगळे अर्ज सादर करता येणार नाहीत, एका पेक्षा जास्त संस्थे करीता अर्ज सादर केल्यास असे अर्ज अपात्र ठरविण्यात येतील.
  3. अर्ज सादर करण्या करीता संकेतस्थळ :- https://gmcnagpur.org
  4. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना https://gmcnagpur.org या अधिकृत संकेत स्थळावर उपलब्ध आहे
  5. अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्या शिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही
  6. अर्ज भरण्याची व परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख संगणका मार्फत निश्चित केली असल्याने पेमेंट गेटवे दिलेल्या तारखेला व वेळेला बंद होणार आहे. त्यामुळे परीक्षार्थी
  7. उमेदवारांनी मुदतीतच अर्ज व परीक्षा शुल्क भरणे बंधनकारक राहील.

महत्वाच्या लिंक :

नागपुर वैद्यकीय महविद्यालय भरती अधिसूचना जाहिरात

ऑनलाइन अर्जाची लिंक

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.