सरकारच्या महाट्रान्सको कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी; डेप्युटी एक्झक्युटिव्ह इंजिनिअर पदांसाठी भरती. | MAHATRANSCO Recruitment  2024

ही जाहिरात शेअर करा 👇🏻

महाट्रान्सको (महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड) ही महाराष्ट्र सरकारच्या मालकीची कंपनी आहे जी राज्यातील विद्युत पारेषणाचे काम करते. महाट्रान्सकोचे मुख्यालय मुंबईत आहे आणि ही कंपनी महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये विद्युत पारेषणासाठी आवश्यक असलेली उर्जा यंत्रणा विकसित करते, देखरेख करते आणि चालवते. विद्युत पारेषणाच्या क्षेत्रात महाट्रान्सको महत्त्वाची भूमिका बजावते आणि राज्यातील वीज पुरवठा सुरळीत आणि अखंडित ठेवण्यासाठी प्रयत्नशील असते.

महाट्रान्सको मध्ये डेप्युटी एक्झक्युटिव्ह इंजिनिअरच्या १३२ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .

शैक्षणिक पात्रता :

  • इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी / तंत्रज्ञानामध्ये बॅचलर पदवी
  • पॉवर ट्रान्समिशनचा एकूण ३ वर्षांचा अनुभव.

निवड प्रक्रिया : निवड केवळ लेखी चाचणीद्वारे (ऑनलाइन चाचणी) होईल. परीक्षेचे स्वरूप खालील  प्रमाणे असेल.

सरकारच्या महाट्रान्सको कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी; डेप्युटी एक्झक्युटिव्ह इंजिनिअर पदांसाठी भरती. | MAHATRANSCO Recruitment  2024

नोकरीचे ठिकाण : मुंबई किंवा महाराष्ट्रात कुठेही.

वयोमर्यादा ३८ वर्षे

अर्ज फी : 

  • इतर खुले प्रवर्ग : ७००/-
  • राखीव प्रवर्ग : ३५०/-

वेतन : Rs. 61830-2515- 74405-2730-139925.

अर्ज कसा भरावा : 

  • ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिली आहे.
  • वेबसाईट वर जाऊन 05/2024 या जाहिरातीसमोरील Apply पर्यायावर वर क्लिक करा
  • न्यू युजर असल्यास रजिस्टर करा.
  • नंतर फॉर्म काळजीपूर्वक भरा. त्यानंतर फोटो सही आणि इतर कागदपत्रे अपलोड करा
  • सर्व माहिती भरल्यावर कन्फर्म करून फॉर्म सबमिट करा.
  • शेवटी पेमेंट करा आणि मग फॉर्म ची प्रत सेव्ह करून ठेवा.

महत्वाच्या लिंक :

महाट्रान्सको अधिसूचना जाहिरात 

ऑनलाइन अर्जाची लिंक

(ऑनलाइन अर्ज सुरू झाल्यावर वृत्तपत्राद्वारे कळविण्यात येईल.)

अर्ज भरायची अंतिम तारीख : दिलेली नाही

इतर सूचना : 

  1. उमेदवार भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
  2. पूर्व-आवश्यकता किमान आहेत आणि त्या फक्त ताब्यात घेतल्याने उमेदवाराला निवड प्रक्रियेसाठी बोलावले जाऊ शकत नाही.
  3. ऑनलाइन चाचणीसाठी उमेदवारांना कॉल करण्यासाठी कॉल लेटर केवळ अर्जामध्ये नमूद केलेल्या ईमेल आयडीवर ईमेलद्वारे पाठवले जातील.
  4. उमेदवारांना त्यांच्या स्वखर्चाने निवड प्रक्रियेसाठी हजर राहावे लागेल. प्रवास खर्चाची परतफेड केली जाणार नाही.
  5. एमएसईटीसीएलमधील भरती योग्यतेनुसार काटेकोरपणे केली जाते. कोणत्याही स्वरूपात प्रचार केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  6. उमेदवाराला त्याच्या स्वत:च्या जोखमीवर निवड प्रक्रियेसाठी हजर राहावे लागेल आणि कोणत्याही स्वरूपाच्या कोणत्याही इजा किंवा नुकसानीसाठी MAHATRANSCO जबाबदार राहणार नाही.
  7. या भरती प्रक्रियेशी संबंधित कोणताही वाद हा माननीय उच्च न्यायालय, मुंबई यांच्या अधिकारक्षेत्रात असेल.
  8. भरतीशी संबंधित सर्व बाबींमध्ये कंपनीचा निर्णय अंतिम असेल आणि कोणत्याही वैयक्तिक पत्रव्यवहाराची दखल घेतली जाणार नाही.

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.