स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया (SAIL), भारत सरकारची एक महारत्न कंपनी असून एक लाख कोटी रु. पेक्षा जास्त उलाढाल असलेली भारतातील एक आघाडीची पोलाद बनवणारी कंपनी आहे.
SAIL मध्ये विविध 249 मॅनेजमेंट ट्रेनी पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .
पदाचे नाव | पदांची संख्या |
केमिकल | 10 |
सिव्हिल | 21 |
कॉम्प्युटर | 9 |
इलेक्ट्रिकल | 61 |
इलेक्ट्रॉनिक्स | 5 |
इन्स्ट्रूमेंटेशन | 11 |
मेकॅनिकल | 69 |
मेटालर्जी | 63 |
SAIL Recruitment Qualification / सेल भरती शैक्षणिक पात्रता :
- संबंधित इंजिनिअरिंग शाखेतून किमान ६५% गुणांसह पदवी. पद निहाय शाखांची यादी जाहिराती मधे दिलेली आहे.
- उमेदवाराने संबधित शाखेतून GATE 2024 परीक्षा दिलेली असावी.
SAIL Recruitment Selection Procedure / सेल भरती निवड प्रक्रिया :
GATE परीक्षेच्या स्कोअरवर उमेदवाराची मुलाखतीसाठी किंवा ग्रुप डिस्कशन साठी निवड करण्यात येईल.
SAIL Recruitment Place of Work / सेल भरती नोकरीचे ठिकाण :
आवश्यकतेनुसार देशभर कुठेही.
SAIL Recruitment Age limit / सेल भरती वयोमर्यादा :
28 वर्षे (२५ जुलै रोजी)
SAIL Recruitment Application fee / सेल भरती अर्ज फी :
- एससी / एसटी / दिव्यांग / कंपनीचे कर्मचारी : २००/-
- इतर प्रवर्ग : ७००/-
SAIL Recruitment Salary / सेल भरती वेतन :
ट्रेंनिग १ वर्षाचे असेल. ट्रेनिंगच्या वेळी ५०,००० वेतन देण्यात येईल. ट्रेंनिंग पूर्ण झाल्यावर असिस्टेंट मॅनेजर म्हणून भरती करण्यात येईल आणि वेतन स्तर ६०,००० – १,८०,००० असेल.
SAIL Recruitment Application Procedure / सेल भरती अर्ज कसा भरावा :
- ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिली आहे.
- न्यू युजर असल्यास वेबसाईट वर जाऊन Register Here वर क्लिक करा आणि रजिस्टर करा.
- नंतर फॉर्म काळजीपूर्वक भरा. त्यानंतर फोटो सही आणि इतर कागदपत्रे अपलोड करा
- सर्व माहिती भरल्यावर कन्फर्म करून फॉर्म सबमिट करा.
- शेवटी पेमेंट करा आणि मग फॉर्म ची प्रत सेव्ह करून ठेवा
SAIL Recruitment Last Date / सेल भरती अर्ज भरायची अंतिम तारीख : २५/०७/२०२४
महत्वाच्या लिंक :
इतर सूचना :
- फक्त भारतीय नागरिक अर्ज करण्यास पात्र आहेत.
- SAIL मध्ये नियमितपणे नोकरीचे किमान वय १८ वर्षे आहे.
- UGC/AICTE द्वारे मान्यताप्राप्त/मान्यता प्राप्त संस्था/विद्यापीठातील पदवी अभ्यासक्रम असलेले उमेदवारच अर्ज करण्यास पात्र असतील.
- अर्ज करताना उमेदवारांनी त्यांचे पूर्ण नाव मॅट्रिकच्या प्रमाणपत्रात जसे दिसते तसे टाकावे.
- उमेदवाराची निवड/जॉईनिंग कंपनीच्या नियमांनुसार वैद्यकीय तंदुरुस्तीच्या अधीन असेल.
- या जाहिरातीविरुद्ध अर्ज करणाऱ्या उमेदवारांचा SAIL ची आवश्यकता पूर्ण झाल्यानंतर, SAIL च्या कोणत्याही उपकंपनी/जॉइंट व्हेंचर कंपनीद्वारे नियुक्तीसाठी विचार केला जाऊ शकतो. अशा परिस्थितीत त्यांची नियुक्ती = संबंधित उपकंपनी/जॉइंट व्हेंचर कंपनीच्या अटी व शर्तींनुसार होईल.
- गैरवर्तनासाठी दोषी आढळलेल्या उमेदवारांवर कारवाई: उमेदवारांना सावध केले जाते की त्यांनी खोटे, छेडछाड/बनावट असलेले कोणतेही तपशील देऊ नयेत आणि अर्ज भरताना त्यांनी कोणतीही महत्त्वाची माहिती दडवून ठेवू नये.
- भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवाराने पात्रता निकषांची पूर्तता केली नसल्याचे आढळून आल्यास आणि/किंवा त्याने/तिने कोणतीही चुकीची खोटी माहिती दिली आहे किंवा कोणतीही भौतिक वस्तुस्थिती दडवली आहे, तर त्याची/तिची उमेदवारी रद्द केली जाईल. नियुक्तीनंतरही यापैकी कोणतीही कमतरता आढळल्यास/तिच्या सेवा बंद केल्या जातील.
- उमेदवाराची पात्रता w.r.t. जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे ऑनलाइन अर्ज मिळाल्याच्या शेवटच्या तारखेनुसार उच्च वयोमर्यादा/पात्रता/श्रेणी गणली जाईल.
- पात्रता, इतर चाचण्या आणि निवड या सर्व बाबतीत SAIL चा निर्णय अंतिम असेल आणि सर्व उमेदवारांना बंधनकारक असेल. या संदर्भात कोणतेही निवेदन किंवा पत्रव्यवहार विचारात घेतला जाणार नाही.
टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.