विविध शाखांतील इंजिनिअरिंग पास उमेदवारांसाठी खुश खबर..! रेल्वे रेक्रूटमेंट बोर्डाकडून ज्युनिअर इंजिनिअर भरतीची घोषणा करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत तब्बल ७९५१ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. या भरती संबंधीची संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे.
पदाचे नाव | पदांची संख्या |
केमिकल सुपरवाईजर / रिसर्च अँड मेटालर्जीकल सुपरवाईजर / रिसर्च | 17 |
ज्युनिअर इंजिनिअर / डेपो मटेरियल सुप्रिटेंडंट अँड केमिकल अँड मेटालर्जीकल असिस्टंट | 7934 |
RRB JE Recruitment Qualification / RRB JE भरती शैक्षणिक पात्रता :
या भरती साठी संबंधित इंजिनिअरिंग शाखेतून B.E, डिप्लोमा किंवा B.sc पदवी असणे आवश्यक आहे. पद निहाय शैक्षणिक पात्रता निकष जाहिरातीच्या पेज नंबर ४० पासून Annexure – A मधे दिले आहेत..
RRB JE Recruitment Selection Procedure / RRB JE भरती निवड प्रक्रिया :
निवड प्रक्रियेमधे खालील टप्प्यांचा समावेश असेल.
(i) पहिला टप्पा संगणक आधारित चाचणी (CBT-I)
(ii) दुसरा टप्पा संगणक आधारित चाचणी (CBT-II)
(iii) दस्तऐवज पडताळणी (DV)
(iv) वैद्यकीय तपासणी (ME)
CBT-I मध्ये १०० प्रश्न असतील आणि ९० मिनिटे वेळ असेल. परीक्षेचा अभ्यासक्रम जाहिराती मध्ये पेज नंबर १२ वर दिलेला आहे. परीक्षेचे स्वरूप खालील प्रमाणे असेल.
RRB JE Recruitment Place of Work / RRB JE भरती नोकरीचे ठिकाण :
रेल्वेच्या विभागानुसार पद संख्या जाहिरातीमद्धे दिलेली आहे. तुम्ही तुमच्या जवळच्या विभागासाठी अर्ज करू शकता.
RRB JE Recruitment Age limit / RRB JE भरती वयोमर्यादा :
१८ ते ३६ वर्षे
RRB JE Recruitment Application fee / RRB JE भरती अर्ज फी :
- एससी / एसटी / दिव्यांग / महिला / इतर राखीव गट : २५०/-
- इतर प्रवर्ग : ५००/-
टीप : CBT-I दिल्यास राखीव गटाची संपूर्ण २५० फी रिफंड होईल आणि खुल्या प्रवर्गाची ४००/- फी रिफंड होईल.
RRB JE Recruitment Salary / RRB JE भरती वेतन :
पदाचे नाव | सुरवातीचे वेतन |
केमिकल सुपरवाईजर / रिसर्च अँड मेटालर्जीकल सुपरवाईजर / रिसर्च | लेवल – 7 (44,900) |
ज्युनिअर इंजिनिअर / डेपो मटेरियल सुप्रिटेंडंट अँड केमिकल अँड मेटालर्जीकल असिस्टंट | लेवल – 6 (35400) |
RRB JE Recruitment Application Procedure / RRB JE भरती अर्ज कसा भरावा :
- ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिली आहे.
- वेबसाईट वर जाऊन न्यू युजर Apply वर जाऊन Create an Account वर क्लिक करा.
- नंतर फॉर्म काळजीपूर्वक भरा. त्यानंतर फोटो सही आणि इतर कागदपत्रे अपलोड करा
- सर्व माहिती भरल्यावर कन्फर्म करून फॉर्म सबमिट करा.
- शेवटी पेमेंट करा आणि मग फॉर्म ची प्रत सेव्ह करून ठेवा.
RRB JE Recruitment Last Date / RRB JE भरती अर्ज भरायची अंतिम तारीख :
29/08/2024
महत्वाच्या लिंक :
(अर्ज स्वीकारण्यास ३० जुलै पासून सुरवात होईल. )
इतर सूचना :
- कृपया ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी सेंटमध्ये दिलेली माहिती पूर्णपणे वाचा.
- या CEN नुसार अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेला किंवा त्यापूर्वी उमेदवारांनी या पदासाठी सर्व विहित शैक्षणिक आणि तांत्रिक पात्रता आहेत/पूर्ण केली आहेत याची खात्री करणे आवश्यक आहे.
- प्रत्येक उमेदवाराला फक्त एक RRB आणि फक्त एक सामान्य ऑनलाइन अर्ज करण्याची परवानगी आहे
- दुसऱ्या टप्प्यातील CBT साठी उमेदवारांची RRB-निहाय शॉर्टलिस्टिंग साधारणपणे रिक्त पदांच्या 15 पटीने (रेल्वे प्रशासनाच्या आवश्यकतेनुसार वाढू किंवा कमी होऊ शकते).
- उमेदवारांकडे त्यांचा स्वतःचा सक्रिय मोबाइल क्रमांक आणि वैध वैयक्तिक ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे
- निगेटिव्ह मार्किंग: CBT मधील प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी वाटप केलेल्या मार्कच्या 1/3 व्या मार्कवर नकारात्मक मार्किंग असेल.
- कम्युनिकेशन डिव्हाईस आणि इलेक्ट्रॉनिक गॅझेट यांसारख्या बंदी असलेल्या वस्तू बाळगणाऱ्या उमेदवारांना परीक्षेला बसू दिले जाणार नाही.
- भारत सरकार / राज्य सरकार / PSU / इतर कोणत्याही सरकारी संस्थांनी सेवेतून बडतर्फ केलेले उमेदवार पात्र नाहीत आणि त्यांनी अर्ज करू नये.
- सर्व कागदपत्रांवर उमेदवाराची स्वाक्षरी एकसमान आणि एकसारखी असावी.
- निवडलेल्या उमेदवारांना विहित ठिकाणी प्रशिक्षण घ्यावे लागेल आणि प्रशिक्षण कालावधी दरम्यान फक्त स्टायपेंड दिला जाईल.
टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.