महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत विविध एकूण २७४ पदांच्या भरतीकरीता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे . महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४, रविवार, दिनांक २८ एप्रिल २०२४ रोजी महाराष्ट्रातील एकूण ३७ जिल्हा केंद्रांवर घेण्यात येईल .
यासंबंधीची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे .
विभाग | संवर्ग | एकूण पदे |
सामान्य प्रशासन विभाग | राज्य सेवा | २०५ |
मृद व जलसंधारण विभाग | महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा | २६ |
महसूल व वन विभाग | महाराष्ट्र वनसेवा सेवा | ४३ |
शैक्षणिक पात्रता :
१. राज्य सेवा परीक्षा :
(१) सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट-अ
- सांविधिक विद्यापीठाची, किमान ५५ टक्क्यांसह वाणिज्य शाखेची स्नातक पदवी, किंवा
- इन्स्टिटयुट ऑफ चार्टर्ड अकांऊटस आफॅ इंडिया यांनी घेतलेली सनदी लेखापालाची अंतिम परीक्षा उत्तीर्ण किंवा
- इन्स्टिटयुट ऑफ कॉस्ट अॅण्ड वर्क्स अकांऊटस यांनी आयोजित केलेली परिव्यय लेखाशास्त्राची अंतिम परीक्षा उत्तीर्ण किंवा
- सांविधिक विद्यापीठाची वाणिज्य मधील पदव्युतर पदवी, किंवा
- अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या मान्यताप्राप्त संस्थेमधून वित्त व्यवसाय प्रशासन या विशेषज्ञतेसह पदव्युत्तर पदवी (एम.बी.ए).
(२) उद्योग उप संचालक, तांत्रिक, गट-अ
- सांविधिक विद्यापीठाची अभियांत्रिकी मधील (स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकी मधील विषयांच्या गटांशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगररचना इत्यादी विषयांव्यतिरिक्त) किंवा तंत्रज्ञानामधील पदवी किंवा
- विज्ञान शाखेतील सांविधिक विद्यापीठाची पदवी.
२. महाराष्ट्र वनसेवा :
(१) सहायक वनसंरक्षक पदाकरीता :-
(अ) खालील विषयांपैकी कमीत कमी एका विषयाची मान्यताप्राप्त विद्यापिठाची पदवी :-
(१) वनस्पतीशास्त्र (२) रसायनशास्त्र (३) वनशास्त्र ( ४ ) भूशास्त्र ( ५ ) गणित (६) भौतिकशास्त्र (७) सांख्यिकी (८) प्राणिशास्त्र (९) उद्यानविद्या (१०) पशुसंवर्धन व पशुवैद्यकशास्त्र किंवा
(ब) कृषि, अभियांत्रिकी यातील स्नातक पदवीधर
(२) वनक्षेत्रपाल पदाकरीता :-
(एक) वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, वनशास्त्र, भूशास्त्र, गणित, भौतिकशास्त्र, सांख्यिकी, प्राणिशास्त्र, उद्यानविद्या शास्त्र, कृषिशास्त्र, कृषि अभियांत्रिकी, रसायन अभियांत्रिकी, स्थापत्य अभियांत्रिकी, संगणक अभियांत्रिकी, विदयुत अभियांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी, यंत्र अभियांत्रिकी, संगणक अॅप्लिकेशन, संगणक विज्ञान, पर्यावरणीय विज्ञान, पशुवैद्यकीय विज्ञान यांपैकी कोणत्याही विषयातील सांविधिक विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदवी किंवा
(दोन) विज्ञान शाखेव्यतिरिक्त इतर शाखेतील गणित विषयासह पदवीधारक.
(तीन) विज्ञान शाखेव्यतिरिक्त इतर शाखेतील गणित विषयासह पदवीधारक उमेदवाराने विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
(चार) शासन पत्र, महसूल व वन विभाग, क्रमांक एफएसटी-०२/१५/प्र.क्र.४६/फ-४, दिनांक ११ फेब्रुवारी, २०१६ नुसार इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलि कम्युनिकेशन अभियांत्रिकी तसेच संगणक विज्ञान व तंत्रज्ञान अभियांत्रिकी अशी अर्हता धारण करणारे उमेदवार वनक्षेत्रपाल पदासाठी अर्ज करण्यास पात्र राहतील. (पाच)शासन पत्र, महसूल व वन विभाग, क्रमांक : एफएसटी-०९/१८/प्र.क्र.३६६/फ-४, दिनांक ८ सप्टेंबर, २०२१ अन्वये प्राप्त अभिप्रायानुसार खालील विद्याशाखेतील पदवीधर उमेदवार पदवीमध्ये गणित विषय घेवून उत्तीर्ण झाले असल्यास व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा विज्ञान शाखेत असल्यास वनक्षेत्रपाल संवर्ग / पदासाठी पात्र असतील :-
(१) BE/B.Tech. Automobile Engineering, (२) BE / B.Tech. Power, (३) BE / B.Tech. Production, ( ४ ) BE / B.Tech. Metallurgy and Material, (५) BE/B.Tech. Textile, (६) BE – Information Technology, (७) BE- Instrumentation, (८) B.Sc. – Biotechnology, (९) B. Pharmacy, (१०) B.Tech. – Food Science
(सहा) वनशास्त्र पदवी प्रवर्गाकरीता आरक्षित असलेल्या वनक्षेत्रपाल पदांकरीता वनशास्त्र पदवीधारक उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर पद परिच्छेद क्रमांक ७.४.२(२) मधील क्रमांक एक ते पाच मध्ये नमूद अर्हता धारकामधून भरण्यात येईल.
महाराष्ट्र वनसेवा शारीरिक पात्रता :
३. स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा :
(१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने त्या पदवीशी समतुल्य असल्याचे घोषित केलेली तत्सम अर्हता.
(२) शासन निर्णय, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, क्रमांक संकिर्ण-२०१३/ (४५/१३)/ भाग-१ /तांशि-२, दिनांक १८ ऑक्टोबर, २०१६ नुसार खालील शैक्षणिक अर्हता स्थापत्य अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाशी समतुल्य आहेत:-
(37) B.E./B. Tech. (Civil and Water Management) (क) B.E. / B. Tech. (Structural)
त्याच बरोबर खालील पात्रता आवश्यक
- मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
- पदवीच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेस बसलेले उमेदवार पूर्व परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र असतील. परंतु मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी अर्हताप्राप्त ठरल्यास मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी विहित पद्धतीने आवश्यक माहिती व परीक्षा शुल्क सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य राहील.
- आंतर्वासिता किंवा कार्यशाळेतील प्रत्यक्ष कामाचा अनुभव आवश्यक असेल अशा पदवी धारकाने शैक्षणिक अर्हतेबाबतची अट मुख्य परीक्षेची माहिती/अर्ज स्वीकारण्याच्या विहित दिनांकापर्यत पूर्ण केली असली पाहिजे.
निवड प्रक्रिया :
- जाहिरातीमध्ये नमूद अर्हता / पात्रतेविषयक अटी किमान असून किमान अर्हता धारण केली म्हणून उमेदवार शिफारशीसाठी पात्र असणार नाही.
- सेवा भरती बाबतची संपूर्ण प्रक्रिया संबंधित संवर्ग / पदाच्या सेवाप्रवेश नियम आणि या संदर्भात शासनाकडून वेळोवेळी करण्यात आलेल्या सुधारणा, आरक्षणासंदर्भातील शासनाचे प्रचलित धोरण तसेच आयोगाच्या कार्यनियमावलीतील तरतुदीनुसार राबविण्यात येईल.
परीक्षेचे टप्पे :
- प्रस्तुत परीक्षेमधून भरावयाच्या विविध संवर्गाकरीता भरती प्रक्रिया खालीलप्रमाणे त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या टप्प्यामध्ये राबविण्यात येईल :-
- संयुक्त पूर्व परीक्षेच्या जाहिरातीस अनुसरुन अर्ज करणा-या उमेदवारांना, शैक्षणिक अर्हतेनुसार पात्र असल्यास ते वरीलपैकी एकापेक्षा जास्त संवर्गासाठी बसू इच्छितात किंवा कसे याबाबत विकल्प (Option) द्यावा लागेल.
- संबंधित संवर्गाच्या पदभरतीकरीता उमेदवाराने दिलेला/ले विकल्प हा / हे संबंधीत संवर्ग भरतीच्या परीक्षेसाठी अर्ज समजण्यात येईल / येतील.
- संयुक्त पूर्व परीक्षेस अर्ज करताना दिलेला विकल्प तसेच, संबंधित संवर्गाच्या परीक्षेमधून भरावयाच्या पदसंख्येच्या आधारे, मुख्य परीक्षेसाठी पात्र करावयाच्या उमेदवारांची संख्या निश्चित करुन, संयुक्त पूर्व परीक्षेमधील गुणांच्या आधारे प्रत्येक संवर्गाच्या परीक्षेसाठी स्वतंत्र निकाल जाहीर करण्यात येईल.
- आयोगाच्या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रस्तुत परीक्षेच्या परीक्षा योजना / पद्धती तसेच अभ्यासक्रमानुसार अंतिम निकाल प्रक्रिया राबविण्यात येईल.
नोकरीचे ठिकाण : आवश्यकतेनुसार महाराष्ट्रातील विविध ठिकाणी
वयोमर्यादा : ३८ वर्षे .
अर्ज फी :
- अमागास रु.५४४/-
- मागासवर्गीय/आ.दु.घ./ अनाथ / दिव्यांग – रु. ३४४/-
- उपरोक्त परीक्षा शुल्काव्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच त्यावरील देय कर अतिरिक्त असतील.
- परीक्षा शुल्क ना-परतावा (Non-refundable) आहे.
पगार : गट-अ व गट-ब संवर्गाच्या वेतन स्तरानुसार
अर्ज कसा भरावा :
- अर्ज फक्त आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे स्वीकारण्यात येतील.
- अर्ज सादर करण्याकरीता संकेतस्थळ :- https://mpsconline.gov.in
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना आयोगाच्या https://mpsconline.gov.in तसेच https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- आयोगास अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही.
- अर्ज भरण्याचे टप्पे
- खाते निर्माण करणे अथवा आवश्यक असल्यास खाते अद्ययावत करणे.
- विहित कालावधीत तसेच विहित पध्दतीने खालीलप्रमाणे लागू असेल त्याप्रमाणे आवश्यक कागदपत्रे अपलोड करुन अर्ज सादर करणे.
- परीक्षा शुल्काचा भरणा विहित पध्दतीने करणे.
- जिल्हा केंद्र निवड करणे.
महत्वाच्या लिंक :
अर्ज भरायची अंतिम तारीख : दिनांक २५ जानेवारी, २०२४ रोजी २३:५९
टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.