माझी नोकरी : सटाणा मर्चेंटस् बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; लिपिक सह विविध पदांसाठी भरती. | Satana Bank Recruitment 2024

ही जाहिरात शेअर करा 👇🏻

महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील अग्रगण्य असलेल्या दि सटाणा मर्चेंटस् को-ऑप. बँक लि., सटाणा, जिल्हा नाशिक मध्ये ‘प्रशासकीय अधिकारी, लेखापाल, शाखाधिकारी, अधिकारी आणि लिपिक’ या पदाकरिता दि महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँक्स् फेडरेशन लि., मुंबई यांचे माध्यमातून केवळ ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे.

पदाचे नाव पदांची संख्या
प्रशासकीय अधिकारी1
लेखापाल1
शाखाधिकारी2
अधिकारी2
लिपिक१०

 

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता 
प्रशासकीय अधिकारी१. मान्यताप्राप्त विद्यापिठाची पदवी
२. MS-CIT किवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक (equivalent certification course)प्राधान्य :
1. वाणिज्य शाखेतील पदवीधारकांना प्राधान्य देण्यात येईल.
2. JAIIB/CAIIB/Diploma in Banking and Finance/Diploma in
Co-operative Management/ DCBM/GDC&A उत्तीर्ण
३. पदव्युतर पदवी तसेच शासन मान्यता प्राप्त इतर संस्थेची (ICM, IIBF,
VAMNICOM इ.) बैंकिंग/सहकार/कायदेविषयक पदविका
लेखापाल१. मान्यताप्राप्त विद्यापिठाची पदवी
२. MS-CIT किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक (equivalent certification course)प्राधान्य :
१. वाणिज्य शाखेतील पदवीधारकांना प्राधान्य देण्यात येईल.
२. JAIIB/CAIIB/ GDC&A/DCM उत्तीर्ण तसेच शासन मान्यता प्राप्त इतर संस्थेची (ICM, IIBF, VAMNICOM इ.) बैंकिंग/सहकार/कायदेविषयक पदविका
शाखाधिकारी१. मान्यताप्राप्त विद्यापिठाची पदवी
२. MS-CIT किवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक (equivalent certification course)प्राधान्य :
1. वाणिज्य शाखेतील पदवीधारकांना प्राधान्य देण्यात येईल.
2. JAIIB/CAIIB/Diploma in Banking and Finance/Diploma in
Co-operative Management/ DCBM/GDC&A उत्तीर्ण
३. पदव्युतर पदवी तसेच शासन मान्यता प्राप्त इतर संस्थेची (ICM, IIBF,
VAMNICOM इ.) बैंकिंग/सहकार/कायदेविषयक पदविका
अधिकारी१. मान्यताप्राप्त विद्यापिठाची पदवी
२. MS-CIT किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक (equivalent certification course)प्राधान्य :
१. वाणिज्य शाखेतील पदवीधारकांना प्राधान्य देण्यात येईल.
२. JAIIB/CAIIB/ GDC&A/DCM उत्तीर्ण तसेच शासन मान्यता प्राप्त इतर संस्थेची (ICM, IIBF, VAMNICOM इ.) बँकिंग/सहकार/कायदेविषयक पदविका
लिपिक१. मान्यताप्राप्त विद्यापिठाची पदवी
२. MS-CIT किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक (equivalent
certification course)प्राधान्य :
१. वाणिज्य शाखेतील पदवीधारकांना प्राधान्य देण्यात येईल.
२. JAIIB/CAIIB/ GDC&A उत्तीर्ण तसेच शासन मान्यता प्राप्त इतर संस्थेची (ICM, IIBF, VAMNICOM इ.) बँकिंग/सहकार/कायदेविषयक पदविका
३. बँका/पतसंस्था किंवा इतर वित्तीय संस्थांमधील कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य.

इतर पात्रता निकष, कामाचे स्वरूप आणि अनुभव विषयी माहिती जाहिरातीमद्धे सविस्तर दिलेली आहे

निवड प्रक्रिया :

  • लिपिक पदाकरिता १०० गुणांची बहूपर्यायी प्रश्नांची ऑफलाईन पद्धतीने इंग्रजी माध्यमातून परीक्षा घेण्यात येईल.
  • इतर पदांकरीता मुलाखत घेण्यात येईल.

नोकरीचे ठिकाण : पद निहाय ठिकाण जाहिरातीमद्धे दिलेले आहे.

वयोमर्यादा : NA

अर्ज फी : लिपिक पदाकरिता परीक्षा शुल्क रु. ८००/- अधिक १८% जी.एस.टी. असे एकूण रु. ९४४/- राहील, तथापि प्रशासकीय अधिकारी, लेखापाल, शाखाधिकारी आणि अधिकारी या पदाकरीता केवळ अर्ज मागविण्याचे शुल्क रु. ५००/- अधिक १८% जी.एस.टी. असे एकूण रु. ५९०/- राहील

वेतन : वेतन बँकेच्या नियमांनुसार असेल.

अर्ज कसा भरावा : 

  • ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिली आहे.
  • न्यू युजर असल्यास रजिस्टर करा.
  • नंतर फॉर्म काळजीपूर्वक भरा. त्यानंतर फोटो सही आणि इतर कागदपत्रे अपलोड करा
  • सर्व माहिती भरल्यावर कन्फर्म करून फॉर्म सबमिट करा.
  • शेवटी पेमेंट करा आणि मग फॉर्म ची प्रत सेव्ह करून ठेवा.

महत्वाच्या लिंक :

अधिसूचना जाहिरात 

ऑनलाइन अर्जाची लिंक

अर्ज भरायची अंतिम तारीख : 14/05/2024

इतर सूचना : 

  1. परीक्षा शुल्क तसेच अर्ज शुल्क संकेतस्थळावर अद्ययावत केल्याशिवाय रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होणार नाही.
  2. सदर भरती प्रक्रियेदरम्यान संकेतस्थळावर असलेल्या सूचनांचे वेळोवेळी अवलोकन व पालन करुन भरती प्रक्रियेची अद्ययावत माहिती प्राप्त करण्याची जबाबदारी उमे‌द्वाराची राहील
  3. उमेद्वारांना ऑफलाईन परीक्षा/कागदपत्रके पडताळणी व प्रत्यक्ष मुलाखतीस स्वखर्चाने उपस्थित रहावे लागेल.
  4. परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेद्वारांची मुलाखतीद्वारे निवड केली जाईल.
  5. अपात्र उमेद्वारांना त्यांचे परीक्षा शुल्क परत दिले जाणार नाही.
  6. लिपिक पदाकरिता परीक्षेचे ठिकाण व दिनांक, परीक्षेचे स्वरुप इ. बाबतची माहिती पात्र उमेद्वारांना फेडरेशनच्या संकेतस्थळावर कळविण्यात येईल.
  7. मुलाखतीचे वेळापत्रक उमे‌द्वारांना फेडरेशनच्या संकेतस्थळावर कळविण्यात येईल.
  8. उमेद्वाराने अर्जात नमूद केलेली सर्व माहिती व तपशील अचूक असावा. सदर माहिती अथवा तपशील चूकीचा अथवा खोटा आढळल्यास सदर उमेद्वाराचा अर्ज नोकरभरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी.
  9. उमेद्वाराने अर्ज अपूर्ण भरल्यास अथवा विहित कालावधीत भरुन न पाठविल्यास सदर उमेद्वार परीक्षेस अपात्र राहील. तसेच त्याला/तिला कोणत्याही प्रकारे भरलेल्या शुल्काची रक्कम परत केली जाणार नाही.
  10. लिपिक परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या व मुलाखत घेतलेल्या पात्र उमेद्वारांना तीन वर्षाचा बॉण्ड तसेच रु. ५०,०००/- इतकी रक्कम सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून संबंधित बँकेत जमा करावी लागेल. उमेद्वाराने तीन वर्षाचे आत बँकेतील नोकरीचा राजीनामा दिल्यास सदरहू सिक्युरिटी डिपॉझिट जप्त केले जाईल. तसेच सदर डिपॉझिटवर संबंधित उमेद्वारास कोणत्याही प्रकारचे व्याज मिळणार नाही, याची सर्व उमे‌द्वारांनी कृपया नोंद घ्यावी.
  11. लिपिक पदाच्या भरतीबाबत फेडरेशनची नियुक्ती बँकेने केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविणे, ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेणे व परीक्षेचा निकाल जाहीर करणे इ. पर्यंतच कामे पार पाडणेकरिता केलेली आहे, याची सर्व उमेद्वारांनी नोंद घ्यावी.

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.