TCS iON NQT 2024 : फ्रेशर्स साठी सुवर्ण संधी; TCS ची ही परीक्षा द्या आणि मिळवा 25 पेक्षा जास्त कंपन्यांमध्ये नोकरी. 

ही जाहिरात शेअर करा 👇🏻

TCS म्हणजेच टाटा कन्सलटंसी लिमिटेड ही जगातील एक प्रमुख आयटी कंपनी असून ही कंपनी जगभरात सुविधा देते. TCS कडून दरवर्षी घेण्यात येणार्‍या नॅशनल क्वालिफायर टेस्ट घोषणा करण्यात आली आहे. या टेस्टच्या माध्यमातून तुम्ही TCS च नव्हे तर इतर 25 पेक्षा जास्त नामांकित कंपन्यांमध्ये  जॉब मिळवू शकता. या टेस्ट संबंधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे.

शैक्षणिक पात्रता : 

  • कोणत्याही शाखेतून अंतिम वर्षात शिकत असणारा विद्यार्थी .
  • 2 वर्षांपर्यंत अनुभव असलेला उमेदवार.
  • 2019, 2020, 2021, 2022, 2023, 2024 बॅच मध्ये पास झालेला आणि जॉब शोधत असलेला उमेदवार.

निवड प्रक्रिया : NQT चे खालील 6 सोपे टप्पे आहेत.

  1.  TCS iON NQT टेस्ट साथी अप्लाय करा आणि टेस्ट द्या.
  2. तुमचा TCS iON NQT स्कोअर मिळावा.
  3. TCS च्या वेबसाइट वर विविध जॉब्स साठी अप्लाय करा.
  4. TCS iON NQT स्कोअर वापरुन इतर कंपन्यांच्या वेबसाइट वर अप्लाय करा.
  5. तुमचा TCS iON NQT स्कोअर आणि योग्यतेच्या आधारावर नोकऱ्या मिळवा

नोकरीचे ठिकाण : देशभर कुठेही.

वयोमर्यादा : NA

अर्ज फी : NQT टेस्ट चे 599, 999 आणि 2298 किमतीची विविध पॅकेज आहेत. तुमच्या योग्यतेनुसार पॅक निवडा.

वेतन : NQT टेस्ट स्कोअर वापरुन तुम्ही वार्षिक 3 ते 11 लाखांपर्यंतची नोकरी मिळवू शकता.

अर्ज कसा भरावा : 

  • ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिली आहे.
  • वेबसाईट वर जाऊन योग्य ते पॅकेज निवडा.
  • पुढे जाऊन रजिस्टर करा. नंतर फॉर्म काळजीपूर्वक भरा.
  • NQT टेस्ट द्या आणि तुमचा स्कोअर मिळवा.

महत्वाच्या लिंक :

ऑनलाइन अर्जाची लिंक

अर्ज भरायची अंतिम तारीख : 11/05/2024

इतर सूचना : 

  1. TCS च्या परीक्षा केंद्रांमध्ये दर 2-4 आठवड्यांनी टेस्ट नियोजित केल्या जातात.
  2. स्कोअर 2 वर्षांसाठी वैध असतो.
  3. तुमचा TCS iON NQT स्कोअर सुधारण्यासाठी तुम्ही कितीही वेळा टेस्ट देऊ शकता.
  4. तुम्हाला चांगली तयारी करण्यात मदत करण्यासाठी मोफत ऑनलाइन शिक्षण अभ्यासक्रम उपलब्द आहे.
  5. टेस्ट सहजतेने पार पाडण्यासाठी मोफत सराव चाचण्या उपलब्द आहेत.
  6. सर्व चाचण्या फक्त इंग्रजी भाषेत घेतल्या जातील आणि कोणतेही नेगेटिव मार्किंग असणार नाही.
  7. जे उमेदवार TCS iON NQT साठी याआधी हजर झाले आहेत आणि त्यांचा TCS iON NQT स्कोअर सुधारू इच्छितात, ते TCS iON NQT प्रकार खरेदी करू शकतात आणि आगामी चाचण्यांमध्ये त्यासाठी उपस्थित राहू शकतात.
  8. उमेदवार त्यांचे तपशील पाहू/संपादित करू शकतील आणि अर्ज बंद होण्याच्या तारखेला/पूर्वी चाचणी(चे) जोडू शकतील.

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.