इंडिया पोस्ट पेमेंट्स बॅंकमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; मुंबईत 50 हून अधिक एक्सेक्युटिव पदांसाठी भरती. | IPPB Recruitment 2024

ही जाहिरात शेअर करा 👇🏻

इंडिया पोस्ट पेमेंट बँकची (IPPB) स्थापना भारतीय डाक विभागाद्वारे करण्यात आली आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून लोकांच्या दारापर्यंत बँकिक सुविधा पोहचवण्याचा उद्देश आहे.

इंडिया पोस्ट पेमेंट बँकमध्ये मुंबई आणि देशातील इतर शहरांमध्ये विविध एक्सेक्युटिव पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .

पदाचे नावपदांची संख्या
एक्सेक्युटिव ( असोसिएट कन्सल्टंट – पेमेंट ॲप्लिकेशन सपोर्ट )5
एक्सेक्युटिव ( कन्सल्टंट – पेमेंट ॲप्लिकेशन सपोर्ट )2
एक्सेक्युटिव ( सिनिअर कन्सल्टंट – पेमेंट ॲप्लिकेशन सपोर्ट )1
एक्सेक्युटिव ( असोसिएट कन्सल्टंट – IT सपोर्ट )23
एक्सेक्युटिव ( कन्सल्टंट – IT सपोर्ट )19
एक्सेक्युटिव ( सिनिअर कन्सल्टंट – कोअर इन्शुरन्स सोल्युशन )1
एक्सेक्युटिव ( सिनिअर कन्सल्टंट – डाटा गव्हर्नन्स )1
एक्सेक्युटिव ( सिनिअर कन्सल्टंट – DC मॅनेजर)1
एक्सेक्युटिव ( सिनिअर कन्सल्टंट – चॅनल्स लीड )1

 

शैक्षणिक पात्रता :  

  • मान्यताप्राप्त विद्यापीठातून कॉम्प्युटर सायन्स / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी / इलेक्ट्रॉनिक्स मधे इंजिनिअरिंग पदवी. किंवा
  • मास्टर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन (MCA) पदवी किंवा
  • कॉम्प्युटर सायन्स / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी / इलेक्ट्रॉनिक्स मधे BCA / B.sc पदवी

इतर पात्रता निकष, कामाचे स्वरूप आणि अनुभव विषयी पद निहाय माहिती जाहिरातीमद्धे सविस्तर दिलेली आहे

निवड प्रक्रिया : प्राप्त झालेले अर्ज तपासण्यात येतील आणि उमेदवाराची गुणवत्ता, अनुभव आणि इतर  निकषांच्या आधारावर मुलाखतीसाठी किंवा पुढील प्रक्रियेसाठी निवड करण्यात येईल.

नोकरीचे ठिकाण : मुंबई , दिल्ली आणि चेन्नई

वयोमर्यादा : 

पदाचे नाव वयोमर्यादा
एक्सेक्युटिव ( असोसिएट कन्सल्टंट )22 ते 30 वर्षे
एक्सेक्युटिव ( कन्सल्टंट )22 ते 40 वर्षे
एक्सेक्युटिव ( सिनिअर कन्सल्टंट )22 ते 45 वर्षे

 

अर्ज फी : 

  • एससी / एसटी / दिव्यांग / : 150/-
  • इतर प्रवर्ग : 750/-

वेतन : 

पदाचे नाव वार्षिक वेतन 
एक्सेक्युटिव ( असोसिएट कन्सल्टंट )₹10,00,000/-
एक्सेक्युटिव ( कन्सल्टंट )₹15,00,000/-
एक्सेक्युटिव ( सिनिअर कन्सल्टंट )₹25,00,000/-

 

अर्ज कसा भरावा :

  1. ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिली आहे.
  2. वेबसाईट वर जाऊन न्यू युजर असल्यास रजिस्टर करा.
  3. नंतर फॉर्म काळजीपूर्वक भरा. त्यानंतर फोटो सही आणि इतर कागदपत्रे अपलोड करा.
  4. सर्व माहिती भरल्यावर कन्फर्म करून फॉर्म सबमिट करा.
  5. शेवटी पेमेंट करा आणि मग फॉर्म ची प्रत सेव्ह करून ठेवा.

महत्वाच्या लिंक :

IPPB अधिसूचना जाहिरात

ऑनलाइन अर्जाची लिंक

अर्ज भरायची अंतिम तारीख : 24/05/2024 11:59 PM

इतर सूचना :

  1. अपूर्ण अर्ज, कोणत्याही बाबतीत नाकारला जाईल आणि पुढील कोणताही पत्रव्यवहार विचारात घेतला जाणार नाही. या व्यतिरिक्त, कोणत्याही परिस्थितीत अर्ज सादर करण्याचा कोणताही अन्य मार्ग/पद्धती स्वीकारली जाणार नाही.
  2. लेखी परीक्षा/मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी कोणत्याही उमेदवाराला TA/DA दिला जाणार नाही
  3. उमेदवाराने ऑनलाइन भरलेला डेटा आणि मूळ साक्ष यामध्ये काही तफावत आढळल्यास, त्याची उमेदवारी नाकारली जाईल.
  4. उमेदवाराने दिलेली कोणतीही माहिती खोटी किंवा चुकीची किंवा पात्रता निकषांशी सुसंगत नसल्याचे आढळल्यास, भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर किंवा भरती झाल्यानंतर किंवा सामील झाल्यानंतर त्याची उमेदवारी नाकारली जाईल.
  5. कोणत्याही प्रश्नांसाठी कृपया ईमेल आयडीवर लिहा: careers@ippbonline.in.
  6. कृपया अर्ज भरण्यापूर्वी तपशीलवार सूचनांमधून जा.

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.