जर तुम्ही पदवीधर असाल आणि नोकरी शोधत असाल तर तुमच्या साठी गुड न्यूज आहे. मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत नागपूर खंडपीठाकडून ४५ क्लार्क पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. या भरती संबंधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे.
शैक्षणिक पात्रता :
- मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी; लॉ पदवी असल्यास प्राधान्य.
- गवरमेंट कमर्शिअल सर्टिफिकेट एक्सामिनेशन किंवा कॉम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स किंवा इंग्लिश टायपिंग मधे ITI कोर्स पूर्ण असावा. टायपिंग स्पीड 40 w.p.m असावा
- MS-CIT किंवा जाहिरातीमद्धे दिलेला इतर समतुल्य कोर्स पूर्ण असावा.
निवड प्रक्रिया : निवड लेखी परीक्षेद्वारे होईल. परीक्षा एकूण 150 गुणांची असेल . परीक्षेचे स्वरूप खालील प्रमाणे असेल. सविस्तर माहिती जाहिरातीमद्धे दिलेली आहे.
- लेखी परीक्षा 90 गुणांची असेल
- टायपिंग टेस्ट 20 गुणांची असेल
- तोंडी परीक्षा 40 गुणांची असेल
भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवारांच्या शॉर्टलिस्टिंगसाठी योग्य पद्धत/पद्धती अवलंबण्याचा अधिकार उच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे. निवडलेल्या उमेदवारांची यादी मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाइटवर प्रदर्शित केली जाईल. केवळ समाधानकारक पात्रता निकष किंवा अर्जाचा फॉर्म स्वीकारला म्हणजे उमेदवार निवडीस पात्र आहे असे नाही
नोकरीचे ठिकाण : नागपुर खंडपीठ, आणि खंडपीठाच्या अंतर्गत येणारी विविध न्यायालये.
वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे
अर्ज फी : 200/-
अर्जाची फी SBI कलेक्ट द्वारे भरायची आहे. या संबंधीच्या अधिक महितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा. फी भरल्यावर त्याची रिसीप्ट सेव करून ठेवा.
वेतन : Pay Matrix of S-10: ₹ 29200 – 92300/- + इतर सुविधा आणि भत्ते
अर्ज कसा भरावा :
- ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिली आहे.
- वेबसाईट वर जाऊन न्यू युजर असल्यास रजिस्टर करा.
- नंतर फॉर्म काळजीपूर्वक भरा. त्यानंतर फोटो सही आणि इतर कागदपत्रे अपलोड करा
- सर्व माहिती भरल्यावर कन्फर्म करून फॉर्म सबमिट करा.
- फॉर्म ची प्रत सेव्ह करून ठेवा.
महत्वाच्या लिंक :
मुंबई उच्च न्यायालय अधिसूचना जाहिरात
अर्ज भरायची अंतिम तारीख : 27/05/2024 (5 PM)
इतर सूचना :
- अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ही जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेला विहित पात्रता अटींची पूर्तता केल्याची खात्री करावी.
- जर उमेदवाराने एकापेक्षा जास्त अर्ज सादर केले तर, त्याने/तिने लक्षात ठेवावे की शेवटचा सबमिट केलेला अर्ज फक्त विचारात घेतला जाईल.
- उमेदवाराने प्रवेशपत्र तयार/डाउनलोड करावे आणि बॉम्बे हायकोर्टाच्या वेबसाईटवर शॉर्टलिस्ट दिल्यानंतर लिंकवरून प्रिंट करून घ्यावे.
- उमेदवारांनी हे लक्षात घ्यावे की एकदा भरलेले शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही
- या निवड प्रक्रियेत कोणत्याही टप्प्यावर उपस्थित केल्या जाणाऱ्या कोणत्याही मुद्द्यावर निवड समितीचा निर्णय अंतिम असेल.
- रिक्त पदांची संख्या तात्पुरती आहे आणि बदलांच्या अधीन आहे म्हणजेच कोणत्याही प्रशासकीय कारणांमुळे वाढ किंवा घट.
टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.