POWERGRID म्हणजे पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) हे भारतातील एक प्रमुख वीज वितरण कंपनी आहे. 1989 मध्ये स्थापन झालेली ही कंपनी भारतातील वीज वितरणाच्या नेटवर्कचे व्यवस्थापन करते. POWERGRID चे मुख्यालय हरियाणा राज्यातील गुरुग्राम येथे आहे. कंपनी वीज वितरणाच्या क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वीज वितरणात कार्यक्षमतेने सुधारणा घडवून आणते. कंपनीचे उद्दिष्ट संपूर्ण भारतातील वीज वितरण व्यवस्था मजबूत करणे आणि विश्वसनीय वीज पुरवठा सुनिश्चित करणे आहे.
पॉवरग्रिड मध्ये इंजीनियर ट्रेनीच्या 435 पदांसाठी मेगा भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .
पदाचे नाव | पदांची संख्या |
इलेक्ट्रिकल | 331 |
सिव्हिल | 53 |
इलेक्ट्रॉनिक्स | 37 |
कॉम्प्युटर सायन्स | 14 |
शैक्षणिक पात्रता :
- मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून संबंधित शाखेतून पूर्णवेळ B.E./ B.Tech/ B.Sc (Engg.) किमान 60% गुणांसह किंवा समतुल्य CGPA.
- GATE 2024 परीक्षेत Valid स्कोअर असणे आवश्यक आहे.
निवड प्रक्रिया : निवड GATE स्कोअर , Group Discussion आणि मुलाखतीद्वारे होईल. या संबंधीची सविस्तर माहिती जाहिरातीमद्धे दिलेली आहे,
नोकरीचे ठिकाण : रिक्त पदे संपूर्ण देशभर आवश्यक आहेत, निवडलेल्या उमेदवारांना आवश्यकतेनुसार अंतिम पोस्टिंगसाठी नियुक्त केले जाईल
वयोमर्यादा : 28 वर्षे
अर्ज फी :
- एससी / एसटी / दिव्यांग / कंपनीचे कर्मचारी / Ex-SM : फी नाही
- इतर प्रवर्ग : 500/-
वेतन : Rs.40,000/- -3%- 1,40,000(IDA)
अर्ज कसा भरावा :
- ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिली आहे.
- वेबसाईट वर जाऊन न्यू युजर असल्यास रजिस्टर करा.
- नंतर फॉर्म काळजीपूर्वक भरा. त्यानंतर फोटो सही आणि इतर कागदपत्रे अपलोड करा
- सर्व माहिती भरल्यावर कन्फर्म करून फॉर्म सबमिट करा.
- शेवटी पेमेंट करा आणि मग फॉर्म ची प्रत सेव्ह करून ठेवा.
महत्वाच्या लिंक :
अर्ज भरायची अंतिम तारीख : 04th July 2024 (23:59 hrs.)
इतर सूचना :
- उमेदवारांनी त्यांच्या प्रमाणपत्रांमध्ये नमूद केल्यानुसार पात्रता संपादन केल्याच्या तारखेसह पात्रता तपशील योग्यरित्या प्रविष्ट करणे आवश्यक आहे.
- उमेदवाराने पूर्ण केलेल्या अर्जाची प्रिंटआउट घ्यावी आणि भविष्यातील संदर्भासाठी सुरक्षितपणे सोबत ठेवावी.
- एकदा सबमिट केलेला अर्ज ऑनलाइन अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत संपादित/अपडेट केला जाऊ शकतो.
- पदासाठी अर्ज करताना उमेदवारांनी जाहिरातीचा संपूर्ण मजकूर पाहणे आणि दिलेल्या सर्व अटी मान्य करणे अनिवार्य आहे.
- आवश्यक असल्यास, पुढील कोणतीही सूचना जारी न करता किंवा त्यानंतर कोणतेही कारण न देता, रिक्त पदांच्या संख्येत बदल करण्याचा अधिकार व्यवस्थापनाकडे आहे.
टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.