Majhi Naukri : रायगड जिल्हा सहकारी बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; २०० लिपिक पदांसाठी भरती. | RDCC Clerk Recruitment 2024

ही जाहिरात शेअर करा 👇🏻

रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित ही रायगड जिल्ह्यातील एक प्रमुख बँक आहे. जिल्ह्यात या बँकेच्या ५८ शाखा असून ही बँक गेल्या ६० वर्षे हून अधिक काळापासून सुविधा देत आहे.

रायगड जिल्हा सहकारी बँकेत २०० लिपिक पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .

Raigad DCC bank Recruitment Qualification / रायगड जिल्हा सहकारी बँक भरती शैक्षणिक पात्रता : 
  • उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेची पदवीधर असावा.
  • उमेदवार एम.एस.सी.आय.टी किंवा शासन मान्यता प्राप्त संस्थेचे किमान ९० दिवसाचे तत्सम संगणक प्रमाणपत्र प्राप्त असावा. (संगणक पदवी असल्यास अट शिथिल)
Raigad DCC bank Recruitment Selection Procedure / रायगड जिल्हा सहकारी बँक भरती निवड प्रक्रिया : 

ऑनलाइन परीक्षा : लिपिक पदाकरिता संगणकाद्वारे ऑनलाईन परीक्षा घेण्यांत येईल. सदर ऑनलाईन परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपाच्या याप्रमाणे ९० गुणांची राहिल. या ऑनलाईन परीक्षेसाठी ९० मिनिटांचा कालावधी राहील. ऑनलाईन परीक्षेसाठी खालील विषयांच्या विस्तृत अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नांचा समावेश असेल. गणित, बँकिंग व सहकार, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, कृषि व ग्रामीण अर्थव्यवस्था, संगणक व माहिती तंत्रज्ञान, बुध्दीमापन चाचणी इत्यादी. तसेच ऑनलाईन परिक्षेचे माध्यम इंग्रजी व मराठी भाषेतून असेल.

कागदपत्रे पडताळणी व मुलाखत : ऑनलाईन परिक्षेतील गुणांच्या गुणानुक्रमे उपरोक्त नमूद पद संख्येच्या १:३ प्रमाणानुसार मुलाखतीस पात्र उमेदवारांची आसन क्रमांक निहाय यादी बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. सदर मुलाखतीस पात्र उमेदवारांस मुलाखतीपुर्वी शैक्षणिक व इतर संबंधित मुळ प्रमाणपत्रांची प्राथमिक कागदपत्रे पडताळणीसाठी व मुलाखतीस मुलाखतपत्र ई-मेल द्वारे उपलब्ध करुन दिले जाईल.  कागदपत्रे पडताळणी वेळी उमेदवाराने मुळ कागदपत्रे उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. प्राथमिक कागदपत्रे पडताळणीमध्ये पात्र होणारा उमेदवारच बँक धोरणाप्रमाणे मुलाखतीस पात्र होईल.

मुलाखत : कागदपत्रे पडताळणीमध्ये मुलाखतीस पात्र होणाऱ्या उमेदवाराची बँक गठीत समितीकडुन मुलाखत घेण्यात येईल. उमेदवार मुलाखतीस गैरहजर राहील्यास तो अंतिम निवडीस पात्र राहणार नाही. सदर मुलाखत १० गुणांची असून सदर गुणांचे भारांकन बँक धोरणानुसार असेल. त्यामध्ये १० पैकी ५ गुण सबंधित उमेदवारांच्या खालील शैक्षणिक पात्रतेनुसार देण्यात येतील व उर्वरित ५ गुण मौखिक मुलाखतीसाठी देण्यात येतील.

Raigad DCC bank Clerk Recruitment Place of Work / रायगड जिल्हा सहकारी बँक लिपिक भरती नोकरीचे ठिकाण : 

बँकेच्या विविध शाखा आणि कार्यालये

Raigad DCC bank Clerk Recruitment Age limit / रायगड जिल्हा सहकारी बँक लिपिक भरती वयोमर्यादा :

किमान २१ वर्ष व कमाल ४२ वर्षे

Raigad DCC bank Clerk Recruitment Application fee / रायगड जिल्हा सहकारी बँक लिपिक भरती अर्ज फी : 

ऑनलाईन परिक्षेकरीता रु. ५९० शुल्क आकारले जाईल.

Raigad DCC bank Clerk Recruitment Salary / रायगड जिल्हा सहकारी बँक लिपिक भरती वेतन : 

२५००० (११४००-११०० (८)-२०२००-१३००(८)-३०६००-१५००(११)-४६०००-१५०० (६)-५५०००)

Raigad DCC bank Recruitment Application Procedure / रायगड जिल्हा सहकारी बँक भरती अर्ज कसा भरावा : 
  • रायगड जिल्हा सहकारी बँक लिपिक भरतीच्या  ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिली आहे.
  • फॉर्म काळजीपूर्वक भरा. त्यानंतर फोटो सही आणि इतर कागदपत्रे अपलोड करा
  • सर्व माहिती भरल्यावर कन्फर्म करून फॉर्म सबमिट करा.
  • शेवटी पेमेंट करा आणि मग फॉर्म ची प्रत सेव्ह करून ठेवा.
Raigad DCC bank Recruitment Last Date / रायगड जिल्हा सहकारी बँक भरती अर्ज भरायची अंतिम तारीख : 

दि. ५ सप्टेंबर २०२४

महत्वाच्या लिंक :

Raigad DCC bank अधिसूचना जाहिरात 

ऑनलाइन अर्जाची लिंक

इतर सूचना : 
  1. उमेदवाराने अर्जात भरलेली माहिती खोटी सादर केल्याचे किंवा सत्य माहिती दडवून ठेवल्याचे निदर्शनास आल्यास त्या उमेदवारांची उमेदवारी/नियुक्ती तात्काळ रद्द करण्यात येईल.
  2. उमेदवारांनी भरती प्रक्रियेकामी कोणत्याही पदाधिकारी/अधिकारी यांचेकडून शिफारस/दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास कोणत्याही टप्प्यावर अपात्र घोषित करुन निवड प्रक्रियेतून बाद केले जाईल.
  3. ऑनलाईन परिक्षेनंतर पात्र उमेदवारांना मुलाखतीचे दिवशी कागदपत्रे पडताळणीसाठी बोलविले जाईल.
  4. उमेदवारांना ऑनलाईन परिक्षा, कागदपत्रे पडताळणी व प्रत्यक्ष मुलाखतीस स्वःखर्चाने उपस्थित रहावे लागेल. CO-OPERATIV CENTRAL
  5. यापुर्वी बँकेकडे याच पदासाठी अर्ज केले असतील तर त्यांचे पुर्वीचे अर्ज ग्राहय धरले जाणार नाही. त्यांना नव्याने ऑनलाईन पद्धतीने विहीत नमून्यात अर्ज सादर करणे आवश्यक राहील.
  6. भरती प्रक्रियेत/निवड कार्यपद्धतीत बदल करण्याचा अधिकार बँकेस असेल व ऐनवेळी काही बदल झाल्यास तो वर्तमानपत्रात किंवा बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द केला जाईल. याबाबत अर्ज केलेल्या उमेदवारांना वैयक्तिक स्वरुपात कळविले जाणार नाही.
  7. उमेदवाराचा महाराष्ट्र राज्यात किमान १५ वर्षे अधिवास असणे आवश्यक आहे.
  8. उमेदवाराची ऑनलाईन परिक्षा प्रामुख्याने नवी मुंबई शहरातील/रायगड जिल्यातील केंद्रावर घेण्यात येईल. मात्र आवश्यकते नुसार इतर केंद्रावरही परिक्षा घेतली जाईल.
  9. उमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
  10. बँकेने सदर भरती प्रक्रिया तसेच परिक्षेसंदर्भातील मार्गदर्शनासाठी कोणत्याही पब्लिकेशन एजन्सीची नियुक्ती केलेली नाही. यासंदर्भात कोणतीही जाहिरात अगर माहिती ही बेकायदेशीर आहे असे समजण्यात यावे.

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.

1 thought on “Majhi Naukri : रायगड जिल्हा सहकारी बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; २०० लिपिक पदांसाठी भरती. | RDCC Clerk Recruitment 2024”

Comments are closed.