महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेअंतर्गत नोकरीची संधी; राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये कोपरेटिव इंटर्न पदांसाठी भरती. | MSC Bank Recruitment 2024

ही जाहिरात शेअर करा 👇🏻

महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक लि., (MSC बँक) मुंबई ही महाराष्ट्र राज्यातील एक सर्वोच्च सहकारी बँक आहे, जी 1911 मध्ये स्थापन झाली आणि एक शेड्युल्ड बँक आहे. बँक तिचे मुंबई येथील मुख्य कार्यालय, 6 क्षेत्रीय कार्यालये आणि महाराष्ट्रात 57 शाखांद्वारे कार्यरत आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि., मुंबई आणि महाराष्ट्रातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये महाराष्ट्र राज्यात राहणाऱ्या व्यावसायिक पदवीधरांकडून एक वर्षासाठी कराराच्या आधारावर प्रत्येकी एक ‘सहकारी इंटर्न’ नियुक्त करण्यासाठी बँक ऑफलाइन अर्ज आमंत्रित करते.

या भरती अंतर्गत खालील जिल्हा बँकांमध्ये प्रत्तेकी कोपरेटिव इंटर्न पद भरण्यात येणार आहे.

  • महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि.,
  • मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.
  • अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.
  • अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.
  • अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.
  • औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.
  • बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.
  • भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.
  • बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.
  • चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.
  • धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.
  • गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.
  • गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.
  • जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.
  • कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.
  • लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.
  • नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.
  • नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.
  • नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.
  • उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.
  • पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.
  • रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.
  • रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.
  • सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.
  • सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.
  • सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.
  • सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.
  • ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.
  • वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.
  • यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.
  • परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.
  • जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.

शैक्षणिक पात्रता

  • मार्केटिंग मॅनेजमेंट/ कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट/ ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट/ रुरल डेव्हलपमेंट मॅनेजमेंट मधील “एमबीए किंवा 02 वर्षाचा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट (PGDM)”. [ ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (AICTE) / विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) द्वारे मान्यताप्राप्त. ]
  • संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक.

निवड प्रक्रिया : प्राप्त झालेले अर्ज तपासण्यात येतील आणि उमेदवाराची गुणवत्ता, अनुभव आणि इतर  निकषांच्या आधारावर मुलाखतीसाठी किंवा पुढील प्रक्रियेसाठी निवड करण्यात येईल.

नोकरीचे ठिकाण : संबंधित जिल्हा बँक कार्यालय

वयोमर्यादा : 21 ते 30 वर्षे

अर्ज फी : NA

वेतन : 25,000/- आणि इतर भत्ते

अर्ज कसा भरावा : 

  • अर्ज ऑफलाइन पद्धतीने पाठवायचा आहे. अर्जाचा नमूना जाहिरातीमद्धे दिलेला आहे.
  • इच्छुक उमेदवारांनी अर्ज नीट भरून आवश्यक कागदपत्रे जोडून खालील पत्त्यावर पाठवावा.
  • पत्ता : “The Manager, (OSD), HRD&M Department, The Maharashtra State Cooperative
    Bank Ltd, Sir Vithaldas Thackersey Memorial Building, 9,
    Maharashtra Chamber of Commerce Lane, Fort, Mumbai- 400001.

महत्वाच्या लिंक :

MSC बँक अधिसूचना जाहिरात 

अर्ज भरायची अंतिम तारीख : 30/06/2024

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.